News Flash

हातात एकही चित्रपट नसताना करिष्मा कमवते कोट्यवधी रुपये!

'यापुढे मी बॉलिवूडमध्ये काम करणार नाही', असे करिष्मानेच एका मुलाखतीत सांगितले होते.

करिष्मा कपूर

बॉलिवूडमध्ये कपूर खानदानाचे असलेले वर्चस्व काही वेगळे सांगायला नको. या कुटुंबातून आलेला प्रत्येक व्यक्ती चित्रपटसृष्टीत चमकला आहे. या कुटुंबातील मुलींना आधी चित्रपटसृष्टीत काम करण्याची परवानगी नव्हती. मात्र, हा पायंडा मोडीत काढत करिष्मा कपूरने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थानही मिळवले. यशाच्या शिखरावर असतानाही करिष्माने लग्नानंतर चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला.

वाचा : ‘हे बेबी’मधील ‘ऐंजल’ आठवते का?

‘यापुढे मी बॉलिवूडमध्ये काम करणार नाही’, असे करिष्मानेच एका मुलाखतीत सांगितले होते. पण, लग्नानंतर २०१२ साली ती ‘डेंजरस इश्क’ चित्रपटात दिसली. हा चित्रपट सपशेल फ्लॉप झाल्यामुळे नंतर तिने चित्रपटात काम केले नाही. करिष्मा आता मुंबईत मुलगी समायरा आणि मुलगा कियान यांच्यासोबत राहते. संजय कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर तिला पोटगी म्हणून १४ कोटी रुपये देण्यात आले. त्याव्यतिरीक्त त्याने मुलांच्या संगोपनासाठी दर महिन्याला तिला १० लाख रुपयेही द्यायचे होते. याच पैशातून करिष्मा तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करते. पण, स्वखर्चासाठी करिष्मा अजूनही काम करते. करिष्मा आता चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी ती बऱ्याच जाहिरातींमध्ये आपल्याला पाहायला मिळते.

वाचा : PHOTO विनोदाची राणी अडकली विवाहबंधनात

चित्रपटसृष्टीला अलविदा केल्यानंतर करिष्माने चॅरिटी संस्थांमध्ये सहभाग घेतला. या संस्था महिला जागरुकतेचे काम करतात. ती सलमान खानच्या ‘बीइंग ह्यूमन फाउंडेशन’शी सुद्धा जोडली गेलेली आहे. केलोग्स, क्रीसेंट लॉन, अॅडमिक्स रिटेल आणि डेनन यांची ती ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. तसेच, स्किन केअर गार्नियरची देखील ती ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. याव्यतिरीक्त ती काही डिझायनर्ससाठी रॅम्प वॉकही करते. ९०च्या दशकापासून करिष्मा वर्ल्ड टूर करत आली आहे. लहान मुलांसाठी वस्तू तयार करणाऱ्या ‘बेबी ओए’ या कंपनीची ती शेअर होल्डर आहे. अशाप्रकारे जाहिराती, फॅशन शो, स्टेज शो आणि कंपन्यांमधील गुंतवणूक या सगळ्यातून करिष्मा दरवर्षाला जवळपास ७२ कोटी रुपये कमवते.

सध्या करिष्मा व्यावसायिक संदीप तोष्णिवालला डेट करत असल्याची चर्चा आहे. हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचेही म्हटले जातेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 3:55 pm

Web Title: without doing any movie karishma kapoor earning alomost 72 crore
Next Stories
1 ‘हे बेबी’मधील ‘ऐंजल’ आठवते का?
2 PHOTO : …अन् प्रार्थनाने त्याचीच साथ देण्याचा निर्णय घेतला
3 ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ नक्की आहे तरी काय?
Just Now!
X