23 January 2020

News Flash

”बिग बॉस’च्या घरात सेक्सशिवाय १०० दिवस कशी राहशील?’

अभिनेत्रीचा गंभीर आरोप

'बिग बॉस'

टेलिव्हिजन रिअॅलिटी शो ‘बिग बॉस तेलुगू’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्रीने बिग बॉस तेलुगूच्या आयोजकांविरोधात शोषणाची तक्रार दाखल केली आहे. ‘सेक्स न करता बिग बॉसच्या घरात १०० दिवस कशी राहशील,’ अशी धक्कादायक विचारणा केल्याने या अभिनेत्रीने हैदराबादमधील बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या सर्व आरोपांनंतर ‘बिग बॉस तेलुगू’चा सूत्रसंचालक व अभिनेता नागार्जुन अक्किनेनी याने निर्मात्यांना शो पुढे ढकलण्याची मागणी केल्याचं समजतंय.

‘बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी सर्व औपचारिकता मी पूर्ण केली होती. त्यावेळी या शोचे समन्वयक मुंबईहून माझ्यासाठी फोनवर बोलत होते. बिग बॉसच्या घरात १०० दिवस मोबाइल फोनशिवाय आणि सेक्स न करता राहशील का असा प्रश्न त्यांनी मला विचारला. त्यांना मला असा प्रश्न का विचारला हे मला समजलंच नाही. त्यानंतर ‘बॉस’ला खुश करण्यासाठी तू काय करू शकतेस असाही धक्कादायक प्रश्न त्याने मला विचारला,’ असं ती म्हणाली. यानंतर २५ जून रोजी तिला एक फोनकॉल आला आणि ती ‘बिग बॉस तेलुगू’मध्ये सहभागी होऊ शकत नसल्याचं फोनवरून सांगण्यात आलं.

याआधी एका पत्रकारितेनेही या शोवर आरोप केले होते. वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस’ प्रसिद्ध आहे. मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ अशा विविध भाषांमध्ये तो शो आहे.

First Published on July 19, 2019 10:28 am

Web Title: woman alleging harassment bigg boss telugu organisers ssv 92
Next Stories
1 Video : ‘मी असा लढलो’, शरद पोंक्षेंनी उलगडली कर्करोगासोबतची झुंज
2 ‘सेक्रेड गेम्स २’, अक्षय कुमार, जॉनशी टक्कर टाळण्यासाठी प्रभासने घेतली माघार
3 खुशखबर… नेटफ्लिक्स स्वस्त होणार, जाणून घ्या नव्या ‘स्वस्त आणि मस्त’ प्लॅनबद्दल
Just Now!
X