News Flash

#MeToo : बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज ११ महिलांनी उचललं महत्वाचं पाऊल

#MeToo प्रकरणामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची नावं समोर आली आहेत.

लैंगिक शोषण आणि गैरवर्तन झालेल्या महिला सध्या #MeToo या मोहिमेअंतर्गंत त्यांच्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. त्यामुळे कलाविश्वासह सर्वच स्तरांवर याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. यातच आता बॉलिवूडमधील काही महिलांनी एक नवा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार #MeToo प्रकरणात दोषी असलेल्या कोणत्याही कलाकासोबत काम न करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला आहे.

#MeToo प्रकरणामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची नावं समोर आली असून त्यांच्यावर लैंगिक शोषण, गैरवर्तनासोबतच मानसिक छळाचेदेखील आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळेच अशा व्यक्तींसोबत काम न करण्याचा निर्णय बॉलिवूडमधील ११ दिग्गज महिलांनी घेतला आहे. अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने तिच्या ट्विटर खात्यावरुन याविषयी माहिती दिली आहे.

हा महत्वाचा निर्णय घेणाऱ्या ११ महिलांमध्ये अलंकृता श्रीवास्तव, किरण राव, एकता कपूर, कोंकणा सेन शर्मा, नंदिता दास, नित्या मेहरा, गौरी शिंदे, रिमा कागती, सोनाली बोस, झोया अख्तर, रूची नारायण यांसह बॉलिवूडमधील अन्य काही महिलांचा समावेश आहे.

‘आम्ही एक महिला आहोत. त्यामुळे एखाद्या महिलेवर अन्याय झाला तर तिच्या वेदना, दु:ख आम्ही समजू शकतो. त्यामुळेच एक महिला आणि दिग्दर्शक या नात्याने आम्ही #MeToo ला पाठिंबा देत आहोत. अन्यायाला वाचा फोडणाऱ्या या महिलांसोबत आम्ही कायम खंबीरपणे उभे आहोत’, असं अलंकृता श्रीवास्तवने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

दरम्यान,  #MeToo अंतर्गंत आरोप करण्यात आलेले कलाकार दोषी असतील तर आता त्यांना या महिलांच्या चित्रपटांमध्ये झळकता येणार नसल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.  #MeToo अंतर्गंत आतापर्यंत विकास बहल, साजिद खान, लव रंजन, आलोक नाथ, सुभाष कपूर, रजत कपूर, सुभाष घई, कैलाश खेर या अभिनेत्यांवर आरोप करण्यात आले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 8:50 am

Web Title: woman film directors refuse to work with proven offenders
टॅग : MeToo
Next Stories
1 ठरलं ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार मी शिवाजी पार्क
2 Video : ‘एक सांगायचंय… Unsaid Harmony’ चा ट्रेलर प्रदर्शित
3 ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची ‘ग्रेटभेट’
Just Now!
X