सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्तने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका महिलेने तोंडाला मास्क लावण्याऐवजी केसांवर लावल्याचे दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे. अनेकांनी या फोटोवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

करोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही नियम आणि अटी लागू केले असून त्यांचे पालन करण्याचे सर्वांना आवाहन केले आहे. अशातच दिव्याने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एका महिलेने तोंडाला मास्क लावण्याऐवजी डोक्याला लावल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर देवालाच माहिती अजून काय काय पाहायला मिळणार असे लिहिले आहे.

दिव्याने शेअर केलेल्या फोटोमधील महिला कोण आहे? हा फोटो कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘मास्कचा योग्य उपोय करणारी आपल्या देशातील महान महिला’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘धन्य है भारतीय नारी’ असे म्हटले आहे. तर काही यूजरनी हसण्याचे इमोजी वापरले आहेत.

भारतात गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. देशात सध्याच्या घडीला १२ लाख ६४ हजार ६९८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी देशात एकाच दिवसात १ लाख ६८ हजार ९१२ करोना रुग्ण आढळले असून आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे. १८ ऑक्टोबरपासूनचा हा उच्चांकी आकडा आहे.