News Flash

झायरा वसिमच्या प्रसंगाविषयी करिना म्हणते, ‘महिला लढवय्या आहेत’

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा त्या मोठ्या धीराने सामना करतात.

Kareena Kapoor
करिना कपूर

‘दंगल’ फेम अभिनेत्री झायरा वसिमशी विमान प्रवासात झालेल्या असभ्य वर्तनाविषयी आता बॉलिवूड वर्तुळातून कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून झायराने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करत झाल्या प्रसंगाची माहिती दिली. व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमक्या कोणत्या प्रसंगाचा सामना केला हे सागंताना तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी पुढे येत झायराचे पाठबळ वाढवले. अभिनेत्री करिना कपूर खान हिनेही ‘लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड्स’मध्ये या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एका अज्ञात इसमाने झायराशी विमानप्रवासादरम्यान असभ्य वर्तणून केल्याप्रकरणी करिनाला विचारले असता ती म्हणाली, ‘माझ्या मते, सर्वच बाबातीत महिला पुरुषांपेक्षा वरचढ आहेत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा त्या मोठ्या धीराने सामना करतात. मग ती परिस्थिती त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत असो किंवा व्यावसायिक आयुष्याशी. महिला खऱ्या अर्थाने लढवय्या आहेत’, असे ती म्हणाली. आपण आपल्या देवीला लक्ष्मी म्हणतो, तिची आराधना करतो, तिच्यापुढे नतमस्तक होतो, तीसुद्धा एक स्त्रीच आहे. आपल्या धरणीला, मातृभूमी म्हणून संबोधतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीच महिलाच वरचढ आहेत, असे म्हणत तिने या सर्व प्रकरणी आपला वेगळा दृष्टीकोन मांडला.

वाचा : असभ्य वर्तन करणाऱ्यांच्या कानशिलात लगावली पाहिजे – बबिता फोगट

करिनाप्रमाणेच अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू यांनीसुद्धा याविषयी आपली मतं मांडली. झायराने अगदी महत्त्वाचा निर्णय घेत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत अन्यायाला वाचा फोडल्याबाबत भूमीने तिची प्रशंसा केली. तर झायराला न्याय मिळाला पाहिजे, असे म्हणत तापसीने तिचे मत मांडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 7:52 pm

Web Title: women are fighters says kareena kapoor khan reacts to zaira wasim alleged molestation on a flight
Next Stories
1 इटलीत विराट-अनुष्काचा विवाहसोहळा संपन्न
2 ‘फुकरे रिटर्न्स’ला यश मिळूनही का भडकली रिचा?
3 किंग खानला ‘जब हॅरी मेट सेजल’चा दुसऱ्यांदा फटका?
Just Now!
X