24 February 2018

News Flash

‘आजकालच्या महिला भोळेपणाचा आव आणतात’

'काही चलाख महिला पुरुषांचंही शोषण करतात.'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: November 15, 2017 4:28 AM

चित्रपट निर्माते मुकेश भट्ट

चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांत बरीच चर्चा झाली. बॉलिवूड वर्तुळातील अनेकांनी त्यावर मतं मांडली. यावर आता चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘आजकाल महिला भोळेपणाचा आव आणतात. समाजात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. त्यामुळे काही महिला पुरुषांचं शोषण करणाऱ्याही असतात,’ असं ते म्हणाले.

इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणावर त्यांना प्रश्न विचारला गेला असता ते म्हणाले की, ‘याप्रकरणी आम्ही काय करू शकतो. एखाद्याचं लैंगिक शोषण होऊ नये यासाठी दिग्दर्शकांच्या कार्यालयाबाहेर मॉरल पोलिसिंग तर नाही ठेवू शकत ना. महिलांचं शोषण करणारे पुरुष समाजात नसतात असं मी म्हणत नाही आहे. पण, आजकालच्या महिला तितक्या साध्याभोळ्या नसतात, जितकं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. काही चलाख महिला पुरुषांचंही शोषण करतात.’

वाचा : ‘पुरस्कार मिळूनही चित्रपटाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’

मुकेश भट्ट यांच्या या वक्तव्यांनंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, अशी सारवासारव नंतर त्यांनी केली. ‘चित्रपटसृष्टीत लैंगिक शोषणासारखे प्रकार घडलेच नाही पाहिजेत आणि त्यात पुरुष किंवा स्त्री असा लिंगभेद केला नाही पाहिजे. कारण स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही याचा सामना करावा लागतो,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

PHOTO : या आहेत सौ. प्रार्थना अभिषेक जावकर

हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टिनवर काही नामांकित अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर हा मुद्दा समोर आला. त्यानंतर सोशल मीडियावरही ‘मी टू’ #MeToo हॅशटॅग ट्रेण्ड झाला, ज्या अंतर्गत जगभरातील महिलांनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला होता.

First Published on November 15, 2017 4:11 am

Web Title: women today not as simple as they pretend to be are cunning and exploitative said mukesh bhatt
  1. Kamalakaant Chitnis
    Nov 15, 2017 at 9:57 am
    मुकेश भट यांच्या म्हणण्यात तथ्य आहे.चित्रपटसृष्टीत शिरकाव करण्यासाठी,प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या स्त्रिया आजही नाहीत का?अनेक यशस्वी व प्रसिद्ध स्त्री कलाकारांनी तडजोड व प्रसिद्धी साठी काय काय केले याचा पाढा प्रामाणिकपणाने वाचतील का?त्यांनी हे सांगण्याची सक्ती अजिबात नाही.नाटकात स्त्रियांना प्रवेशच नव्हता आणि चित्रपटसृष्टीत चांगल्या घरातील स्त्रिया येण्यास कचरत होत्या.अगदी दादासाहेब फाळक्यांनाही हे जमवताना फार त्रास पडला हा इतिहास आहे मात्र जसजसा चित्रपट व्यवसाय फोफोवू लागला तसा स्त्रियांचा विरोध केवळ मावळालाच नाही तर स्त्रियांचा पुढाकार वाढला.ब्रह्मचारी सिनेमात वेडिंग सूट घालण्यासाठी आचार्य अत्रे व विनायक यांनी जेव्हा मीना शिरोडकरांना सुचवले तेव्हा त्यांनी हे करण्यास नकार दिला पण पतीने संमती दिल्यावर हे धाडस त्यांनी केलेच! एकूण स्त्रिया व प्रसिद्धी यात तडजोडीचा मुद्दा जेव्हा जेव्हा आला तेव्हा स्त्रियांचे पालक यांनी स्त्रियांना मिळणाऱ्या मोबदल्याकडे पाहून स्त्रियांचे शोषण होणार याकडे डोळेझाक करण्यास संमती दिलीच.म्हणून यशस्वी स्त्री कलाकारांनी कांगावा करू नये.
    Reply