बॉलिवूडमधील आपल्या फेव्हरेट सेलिब्रिटीला पाहिल्यानंतर चाहते वेडावून गेल्याचं पाहायला मिळतं. चाहत्यांच्या गर्दीतून बाहेर पडणं सेलिब्रिटींना बऱ्याचदा मुश्किलीचं होतं. असाचं काहीसा प्रसंग ग्लॅमगर्ल दीपिका पादूकोणसोबत घडलाय. दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

गुरुवारी रात्री उशीरा एका हॉटेलबाहेर दीपिकाला स्पॉट केलं गेलं. जेवणानंतर हॉटेलमधून बाहेर पडतं असताना दीपिकाला पाहताच मोठी गर्दी झाली. या गर्दीतून बाहेर पडणं दीपिकासाठी मोठं कठीण झालं. बॉडीगार्डच्या मदतीने दीपिका गर्दीतून वाट काढत होती. मात्र यावेळी चाहत्यांसोबतच काही टिश्यू पेपर विकणाऱ्या महिला दीपिकासमोर आल्या. टिश्यू विकत घेण्यासाठी त्यांनी दीपिकाकडे तगादा लावला. या सगळ्यातून वाट काढत ती कशीबशी गाडीपर्यंत पोहचली. मात्र फोटोग्राफर्स आणि चाहत्यांची गर्दी गाडीपर्यंत आली.  दीपिका गाडीत बसत असताना टिश्यू विकणाऱ्या एका महिलेनं तिची पर्स खेचली. यावेळी काहिसा गोंधळ उडाला. मात्र दीपिकाच्या सहकाऱ्यांनी लगेचच महिलेच्या हातून पर्स सोडवून घेत दीपिकाला ती परत केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर दिपीकाचा हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायर होतोय. गर्दीतही दीपिकाने चाहत्यावर नाराज न होता वाट काढली. मात्र तिची पर्स खेचल्यावर ती काहीशी गोंधळून गेल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय.