वंडर वुमन १९८४ हा वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक म्हणून चर्चेत आहे. खरं तर हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे हा सुपरहिरोपट चार वेळा लांबणीवर गेला. परंतु अखेर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर हा बहुप्रतिक्षित वंडर वुमन १९८४ येत्या २५ डिसेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री गॅल गेडॉटने स्वत: सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.

अवश्य पाहा – ‘वंडर वुमन’चा ओपनिंग सीन पाहिलात का?; १३ वर्षीय अभिनेत्रीचे स्टंट पाहून तोंडात बोटे घालाल

गॅलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जगातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलिफाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या इमारतीवर वंडर वुमन १९८४ चा ट्रेलर झळकत आहे. या ट्रेलरमध्ये डायना प्रिंस अर्थात वंडर वुमनचे आश्चर्यचकित करणारे स्टंट पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने आपल्या बहुप्रतिक्षित चित्रपटाची रिलिज डेट चाहत्यांना सांगितली आहे. युरोप आणि अमेरिकेत हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर भारतात येत्या २५ डिसेंबरला वंडर वुमन १९८४ प्रदर्शित होईल.

अवश्य पाहा – अरे बापरे… ही अभिनेत्री एका फोटोशूटसाठी घेते २०० कोटी

 

View this post on Instagram

 

A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

‘वंडर वुमन १९८४’ हा एक फिमेल सुपरहिरो चित्रपट आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘वंडर वुमन’ २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री गॅल गेडॉट हिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या जबरदस्त अ‍ॅक्शन आणि अफलातून अभिनयामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने जवळपास ५०० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘वंडर वुमन’चा दुसरा भाग तयार करण्यात आला आहे.