News Flash

‘वंडर वूमन’ होणार तिसऱ्यांदा आई, चाहत्यांना दिली गोड बातमी

सोशल मीडियावरुन व्यक्त केला आनंद

हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री गल गॅडोत हिनं तिच्या अभिनयाने जगाचं लक्ष वेधून घेतलंय. गल गॅडोटच्या ‘वंडर वूमन 1984’ या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळाला. 2017 सालात आलेल्या ‘वंडर वूमन’ सिनेमाचा हा सिक्वल होता. या सिनेमातील गल गॅडोतच्या अभिनयाची सर्वाधिक प्रशंसा झाली.

गल गॅडोतने तिच्या चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर केलीय. गल गॅडोत तिसऱ्यांदा आई होणार आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती आणि तिच्या दोन मुलींसोबत फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आई होत असल्याचं सांगितलं. या फोटोत तिच्या पतीने आणि मुलींनी तिच्या पोटावर हात ठेवल्याचं दिसतंय. ”आणि पुन्हा एकदा..” असं कॅप्शन तिने फोटोला दिलंय. तिच्या या पोस्टनंतर अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी र शुभेच्छांचा वर्षाव केलाय. तर अनेक चाहत्यांनीदेखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

गल गॅडोत सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करतेय. येत्या काळात इजिप्तमधील सर्वाधिक काळ साम्राज्याची धुरा सांभाळणाऱ्या  क्लिओपैट्रा या महिला साम्राज्ञीच्या जीवनावर आधारित सिनेमामध्ये ती झळकणार आहे. वयाच्या 18 वर्षी गल गॅडोतने मिस इस्त्राईलचा किताब जिंकला होता. विशेष म्हणजे तिने सैनिकी शिक्षण घेतलं असून काही काळ इस्त्राईलच्या सैन्य दलात कामही केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

वंडर वूमन या सिनेमाने गल गॅलोतला विशेष ओळख दिलीय. अ‍ॅक्शन सिनेमा असलेल्या या सिनेमातील तिचा दमदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना अधिक आवडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 7:12 pm

Web Title: wonder women fame gal gadot expecting her third child kpw 89
टॅग : Celebrity,Hollywood
Next Stories
1 म्हणून त्याने रस्त्यात अजय देवगणची गाडी अडवली…!!
2 ‘तुझं माझं जमतंय’ चे १०० भाग पूर्ण; आता पम्मी आणणार कथेत ट्विस्ट!
3 मोठ्या ब्रेकनंतर ‘ही’अभिनेत्री करणार आहे कमबॅक
Just Now!
X