02 March 2021

News Flash

‘आता मी आनंदाने मृत्युला समोरं जाईन’

'ब्रह्मास्त्र' या चित्रपटामध्ये मौनीने अमिताभ  बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे.

मौनी रॉय

चंदेरी दुनियेमध्ये पदार्पण करावं, स्टारडम अनुभवावं असं प्रत्येक नवोदित कलाकाराची इच्छा असते. हीच इच्छा उराशी बाळगून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनीच्या पदरामध्ये एक-एक कर नवनवीन चित्रपट आहे. त्यामुळे ती लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटामुळे तिला अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली. एका मुलाखतीमध्ये तिने बिग बींसोबत काम करण्याच्या अनुभवाचं कथन केलं असून आता मी मरणाला समोरं जाण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये मौनीने अमिताभ  बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली असून या दोघांसोबत काम करण्याचा अनुभव एकदम मस्त आणि खूप काही शिकण्यासारखा होता, असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर जीवनात एकदा तरी बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळावी ही माझी लहानपणापासून इच्छा होती ही इच्छा या चित्रपटामुळे पूर्ण झाल्याचंही तिने सांगितलं.

‘आयुष्यात एकदा तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करता यावं ही माझी मनापासून इच्छा होती. ‘ब्रह्मास्त्र’च्या माध्यमातून ही इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे आता आयुष्यात कोणत्याही वळणावर मला मृत्युने गाठलं तरी माझी काही हरकत नाही. माझी इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे मृत्युने जरी मला कवटाळलं तरी मी आनंदाने त्याला समोरी जाईन’, असं मौनी म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘अमिताभ यांच्याकडून खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यांनी सेटवर कधीही आम्हाला ज्युनियर समजलं नाही. कायमच काही अडचण आल्यावर त्यांनी ती दूर करण्यास आमची मदत केली आहे. अभिनयातले बारकावे मला त्यांच्यामुळेच शिकता आले’.

दरम्यान, छोट्या पडद्यावरुन थेट बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मौनी हळूहळू बॉलिवूडमध्ये तिचा जम बसवत आहे. ‘गोल्ड’नंतर ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणाऱ्या मौनीकडे आणखी दोन चित्रपट असून ती लवकरच या चित्रपटातून तिच्या अभिनयाची चुणूक दाखविणार आहे. जॉन अब्राहमच्या ‘रॉ’ आणि राजकुमारच्या ‘मेड इन चायना’ या चित्रपटात ती दिसणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 11:37 am

Web Title: working with amitabh bachchan in brahmastra movie mouni roy said now i can die happily
Next Stories
1 संरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत
2 ‘भाईजान’कडून कपिलला दिवाळीची खास भेट
3  #MeToo : सई परांजपेंचा माजी केंद्रीय मंत्र्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप
Just Now!
X