१९ नोव्हेबंर रोजी ‘वर्ल्ड टॉयलेट डे’ साजरा केला जातो. या निमित्ताने अभिनेत्री अमृता खानिवालकरने खास संदेश दिला आहे. अमृताची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तिने सामाजिक संदेश दिला आहे.

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरची प्रसिद्धी दिवसागणिक वाढत आहे. आपल्या अभिनय कौशल्याद्वारे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत विशेष छाप पाडणाऱ्या या अभिनेत्रीची सामाजिक संदेशपर, नुकतीच एक जाहिरात सोशल नेटवर्किंग साईटवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ‘वर्ल्ड टॉयलेट डे’ वर आधारित असलेल्या या जाहिरातीत अमृताने समानतेचा संदेश दिला आहे.

घरातली माणसे जशी समान असतात, अगदी तशीच समान घरकाम करणारी बाईदेखील असते. ती धुणीभांडी आणि स्वयंपाक करून घरातल्या सर्वांची काळजी घेत असते, त्यामुळे तिलादेखील घरातल्या सदस्यांइतकाच मान सन्मान मिळायला हवा. असा संदेश अमृता या जाहिरातींमार्फत प्रेक्षकांना देत आहे. या जाहिरातीमुळे, अमृता एका कुशल अभिनेत्रीबरोबरच समाजातील एक सुजान नागरिकदेखील आहे, याचा प्रत्यय आपल्याला येतो.