कतरिना आणि रणबीर कपूर यांच्यात ब्रेकअप झाल्यानंतर यामागे सलमान खान असल्याची चर्चा सध्या आहे. सलमान खानचे कतरिनासोबतचे वागणे त्यांच्या चाहत्यांसाठी प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.
सलमान खानने अचानक ‘कॉमेडी नाइट्स लाइव्ह’ च्या सेटवर जाऊन कतरिनाला आश्चर्यचकित केले. कोणालाही कल्पना नसताना तिथे सलमान अचानक हजर झाल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
काही दिवसापूर्वीच सलमानने ‘बिग बॉस’ शोमध्ये कतरिनाचे भरपूर कौतुक केले होते. त्यावेळी सलमान खानने कतरिना कैफला स्वतः बनवलेले एक पोर्ट्रेट भेटस्वरुपात दिलेले. ही भेट कतरिनाने आनंदाने स्वीकारली. या सर्व गोष्टींमुळे सलमान आणि कतरिनाच्या प्रेम संबंधाची चर्चा बॅालीवूड विश्वात रंगली आहे.