News Flash

असभ्य वर्तन करणाऱ्यांच्या कानशिलात लगावली पाहिजे – बबिता फोगट

झायरा वसिमच्या त्या व्हिडिओनंतर बबिता फोगटची संतप्त प्रतिक्रिया

babita
झायरा वसिम, बबिता फोगट

मुंबई-दिल्ली विमान प्रवासामध्ये ‘दंगल’ फेम अभिनेत्री झायरा वसिमशी एका अज्ञात इसमाने असभ्य वर्तन केल्याचे वृत्त सध्या चर्चेत आहे. याबाबत खुद्द झायरानेच तिच्या सोशल मीडियावरुन सर्वांना माहिती दिली होती. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भिती आणि संताप पाहायला मिळत होता. आपल्या मागच्या सीटवर बसलेला तो व्यक्ती पायाने आपल्या मानेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने स्पष्ट केले होते. या प्रसंगाविषयी माहिती मिळताच सोशल मीडियावर अनेकांनीच ‘एअर विस्तारा’विषयी आणि त्या प्रसंगाविषयी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

झायराचा व्हिडिओ पाहून खुद्द कुस्तीपटू बबिता फोगटनेही झाल्या प्रकाराविषयी चीड व्यक्त केली. बबिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मुलीचे वडील तिला प्रेमाने बाहुली म्हणतात. पण, याचा अर्थ असा होत नाही की, तिला तुम्ही एखाद्या खेळण्याप्रमाणेच वागवाल.’

‘ज्यावेळी मला या दुर्दैवी प्रसंगाविषयी माहिती मिळाली, तेव्हा मला प्रचंड चीड आली’, असे म्हणत ‘आपला समाज नेमका कुठे चालला आहे?’, असा संतप्त प्रश्न बबिताने या व्हिडिओतून उपस्थित केला. ‘हे असं कोणीतरी नीच प्रवृत्तीचा माणूसच करु शकतो. असे दुष्कृत्य करणाऱ्यांना एक सणसणीत कानशिलात लगावली पाहिजे, जेणेकरुन पुन्हा कोणीही असे वागण्याचा विचारही करणार नाही’, असे बबिताने या व्हिडिओत म्हटले. त्यासोबतच तिने ‘दंगल गर्ल’ झायराला खऱ्या आयुष्यातही ‘धाकड’ होण्याचा सल्ला दिला आहे.

‘झायरा तू ‘दंगल’ चित्रपटात फोगट बहिणींची भूमिका साकारली होतीस. त्यामुळे आता तू कोणालाही घाबरण्याची गरज नाही. खऱ्या आयुष्यातही तू ‘धाकड’ बन’, असे बबिता तिला उद्देशून म्हणाली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त झायरानेच नव्हे तर, सर्वच मुलींनी काही बाबतीत सतर्कता पाळण्याची गरज असल्याचेही तिने सांगितले.  झायराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, अनेकांनीच त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‘एअर विस्तारा’तर्फे त्या दुर्दैवी प्रसंगाचा सामना करावा लागल्याप्रकरणी झायराची माफी मागितली.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 12:03 pm

Web Title: wrestler babita phogat on teen dangal girl zaira wasim alleged molestation bollywood actress
Next Stories
1 PHOTO : ‘रेगे’ फेम आरोह वेलणकरचे हटके प्री-वेडिंग फोटोशूट
2 दिलीप कुमार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत
3 पुढची दोन वर्षे विरुष्काच्या वैवाहिक जीवनासाठी कठीण?
Just Now!
X