News Flash

‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होण्यासाठी ‘हानिकारक बापू’ उत्सुक

गीताला जिंकण्यापासून कोणीच अडवू शकत नाही.

खऱ्या आयुष्यातील 'दंगल गर्ल्स'सोबत महावीर सिंग फोगट

‘दंगल’ या चित्रपटातून ज्या कुस्तीपटूच्या आणि त्यांच्या मुलींच्या यशावर भाष्य करण्यात आलं होतं त्यांच्या जीवनाला या चित्रपटामुळे एक वेगळीच कलाटणी मिळाली. या चित्रपटामुळे कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुली गीता- बबिता फोगट यांच्या आजवरच्या प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला. या चित्रपटानंतर महावीर सिंग आणि त्यांच्या मुलींना सेलिब्रिटींप्रमाणे वागणूक दिली जाऊ लागली. अशा या ‘हानिकारक बापूं’नी आता चक्क ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कुस्तीपटू गीता फोगटसुद्धा ‘खतरों के खिलाडी’च्या नव्या पर्वात सहभागी होणार आहे. त्याविषयी प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. ‘या आव्हानात गीताला जिंकण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. त्यामुळे ती उत्तम परफॉर्म करेल यात शंकाच नाही. आपली पात्रता आणि इतरांच्या अपेक्षा जाणत त्या पूर्ण करण्यासाठीच गीता सदैव प्रयत्नशील असते’, असं ते म्हणाले.  सोबतच, त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. ‘संधी मिळाली तर, मीसुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग होऊ इच्छितो. कारण आजही मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे’, असं म्हणत त्यांनी या कार्यक्रमाचा एक भाग होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमात विविध सेलिब्रिटी स्पर्धकांचा सहभाग असून त्यात सेलिब्रिटींसमोर बरीच आव्हानं देण्यात येतात. प्रत्येक आव्हान पेलत आणि टास्क पूर्ण करत यात सेलिब्रिटींच्या साहसाची आणि जिद्दीची परीक्षा पाहायला मिळते. अशा या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात गीता फोगट सोबतच मनवीर गुर्जर, रित्विक झनजानी, लोपामुद्रा राऊत हे सेलिब्रिटीसुद्धा काही थरारक खेळ खेळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 5:19 pm

Web Title: wrestler dangal mahavir singh phogat wants to take part in television reality show khatron ke khiladi
Next Stories
1 सर्जरीदरम्यान झाला मॉडेलचा मृत्यू, १०० हून जास्त केल्या प्लॅस्टिक सर्जरी
2 वजन कमी करण्यासाठी आलियाचा ‘डाएट प्लॅन’
3 ‘देसी गर्ल’चं पहिलं फोटोशूट पाहिलं का?
Just Now!
X