27 February 2021

News Flash

‘काम झालं की कंगना लाथ मारायलाही कमी करत नाही’

'सिमरण' चित्रपटातही तिनं श्रेय लाटलं असा आरोप पटकथालेखक अपूर्वनं केला आहे.

‘मणिकर्णिका’च्या यशानंतर एकीकडे अभिनेत्री कंगना रणौतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे तर दुसरीकडे तिच्यावर श्रेय लाटण्याचाही आरोपही होत आहे. या आरोपानं आता वेगळचं वळण घेतलं आहे. ‘मणिकर्णिका’चा दिग्दर्शक क्रिशच्या आरोपानंतर आता पटकथा लेखक अपूर्व असरानी यानंदेखील कंगनावर कडाडून टिका केली आहे. ‘ एखाद्याच्या कामात हस्तक्षेप करण्याची कंगनाची सवय नवीन नाही. तिचा खेळ हा नेहमीच क्रूर असतो’ असं म्हणतं अपूर्वनं कंगनावर जळजळीत टीका केली आहे.

‘सिमरण’ चित्रपटात कंगाननं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या कामात तिनं हस्तक्षेप केला. कहर म्हणजे या चित्रपटातील संवाद आणि कथेसाठी मूळ लेखकाआधी तिला श्रेय देण्यात आलं होतं. सिमरणसाठी जीव तोडून मी मेहनत घेतली होती पण सारं श्रेय ती घेऊन गेली’ असं ट्विट करत अपूर्वनं राग व्यक्त केला.

‘कंगनाच्या मनात असुरक्षिततेची भावना नेहमी येते. याच भावनेतून तिनं इतर कलाकारांचे संवादही कापले होते. कंगानाचा खेळ हा खूपच क्रूर असतो. सुरूवातीला तिच्यावर अन्याय झाल्याचं ती दाखवते आणि तुमचा विश्वास संपादन करते. तिच्यावर विश्वास ठेवून तुम्ही तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. ती तुमचा वापर करून घेते आणि मग तुम्हाला बाहेर फेकून द्यायलाही ती मागेपुढे पाहत नाही. एवढ्यावरच न थांबत ती पत्रकारांचा गैरवापर करून तुमच्याच विरोधात जायलाही कमी करत नाही’ असं अपूर्व आपल्या ट्विटमध्ये म्हणाला.

‘मणिकर्णिका’चे दिग्दर्शक क्रिश यानं एका मुलाखतीत कंगानावर जे आरोप केले त्या आरोपांचं समर्थन करत अपूर्वनं काही ट्विट केले. या ट्विटमधून त्यानं आपली नाराजी बोलून दाखवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 11:22 am

Web Title: writer apurva asrani alleged that kangana tried to discredit his work in simran
Next Stories
1 सुशील कुमार शिंदे यांच्या नातवाला डेट करत होती सारा
2 Photos : नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनंतर रणबीर-आलियाची ‘उमंग’ कार्यक्रमात एकत्र हजेरी
3 #PosterLagwaDo : क्रिती- कार्तिकला सरप्राइज देण्यासाठी आला खास पाहुणा
Just Now!
X