नाटककार, चित्रपट पटकथा-संवाद लेखक, गीतकार, जाहिरातींसाठी कॉपी रायटर, दिग्दर्शक, विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी संहिता लेखन अशा विविध भूमिकांमधून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारा चेहरा म्हणून क्षितिज पटवर्धन याची ओळख आहे. मराठी चित्रपट आणि नाटय़सृष्टीत क्षितिजने अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आहे. तरुणाईची नेमकी नस त्याने पकडली असल्याने आणि तो स्वत:ही तरुण असल्याने त्याचे लेखन हे तरुणाईला आवडते व ते ताजे-टवटवीतही वाटते. लेखकांच्या मानधनाबाबत क्षितिजनं महत्त्वपूर्ण मत  ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत मांडलंय.