दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘न्यूड’ या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप प्रसिद्ध हिंदी लेखिका मनिषा कुलश्रेष्ठ यांनी केला आहे. ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ वगळण्यात आल्याने चर्चेत आला. हा चित्रपट आपल्या ‘कालिंदी’ या लघुकथेवरून घेतल्याचा दावा मनिषा यांनी केला आहे. त्याचप्रमाणे याविरोधात कायदेशीर कारवाईचाही इशाराही त्यांनी दिला.

माझी ‘कालिंदी’ ही लुघकथा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. यापूर्वीही मी दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी मला नीट उत्तर दिलं नाही. आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर, ही माझीच कथा असल्याचं समजलं,’ असं त्या म्हणाल्या.
रवी जाधव यांच्या या चित्रपटात न्यूड मॉडेल असलेल्या एका महिलेचा मुंबईत जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. हीच कथा मनिषा यांच्या ‘कालिंदी’ या लघुकथेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात पुढे त्या म्हणाल्या की, ‘लेखकांना सौजन्य किंवा पैसे द्यायचे नसतात, म्हणून अशा घटना घडतात. वेळ पडल्यास मी रवी जाधव यांच्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करेन.’

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
arvind kjriwal jail tihar
अरविंद केजरीवाल करणार वर्क फ्रॉम जेल? काय आहेत कायदेशीर तरतुदी?
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

वाचा : ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

‘न्यूड’ हा चित्रपट ‘इफ्फी’तून वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून घेण्यात आला होता. परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा चित्रपट अचानक वगळण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणात रवी जाधव यांची बाजू ऐकण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर शुक्रवारीच त्यांनी प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियापासून लांब राहणार असल्याची फेसबुक पोस्ट लिहिलेली. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकलेली नाही.