News Flash

..आणि ‘रुस्तम’ इथे चुकला

अक्षय कुमारने परिधान केलेल्या नौदलाच्या गणवेशामध्ये अनेक चुका

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रुस्तम’ या चित्रपटाने आतापर्यंत बी टाऊनमध्ये चांगलाच गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमारने साकारलेली भूमिका अनेकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. टिनू सुरेश देसाईच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘रुस्तम’ या चित्रपटात अक्षय कुमार पहिल्यांदाच एका नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेरसिकांना १९५९ मधील बहुचर्चित नानावटी केसचा थरारक काळ अनुभवण्याची संधी मिळत आहे. असे असतानाच सोशल मीडियावर मात्र या चित्रपटाबाबतची एक वेगळीच चर्चा रंगत आहे. अक्षय कुमारने परिधान केलेल्या नौदलाच्या गणवेशामध्ये अनेक चुका निदर्शनात आणण्याचे काम सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
हल्लीच्या काळात प्रदर्शित होणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या प्रदर्शनानंतर चुका काढण्याचा जणू ट्रेंडच आला आहे. मग, या ट्रेंडपासून खिलाडी कुमारचा ‘रुस्तम’ही दूर राहिलेला नाही. थरारक कथानकाला देशभक्तिची झाक देण्यात हा चित्रपट यशस्वी झाला असला तरीही अक्षयच्या गणवेशावर मात्र आता टिका होत आहे. अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ रुपातील गणवेशामधल्या चुका दर्शवणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. गणवेशाच्या मुद्द्यावरुन टिका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शाहरुख खानच्या ‘जब तक है जान’ या चित्रपटामध्ये त्याने साकारलेल्या भूमिकेवर अनेक टिका करण्यात आल्या होत्या. आशुतोष गोवारीकर यांच्या दिग्दर्शात साकारलेल्या ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटाला अक्षयचा रुस्तम चांगलीच टक्कर देत आहे.

rustom

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 4:34 pm

Web Title: wrong navy uniform in akshay kumar film rustom
Next Stories
1 मलाइका आणि अरबाज खान पुन्हा एकत्र येणार?
2 ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ मधला ‘डॉल्बीवाल्या’ सर्वांच्या भेटीला
3 ‘बॅन्जो’ सिनेमातल्या ‘बाप्पा’ गाण्याचा टिझर प्रदर्शित
Just Now!
X