29 September 2020

News Flash

WWE सुपरस्टार ‘बुलेट बॉब’ यांचं उपचारादरम्यान निधन

WWE सुपरस्टार काळाच्या पडद्याआड; चाहत्यांमध्ये पसरली शोककळा

WWE हॉल ऑफ फेम बॉब आर्मस्ट्राँग यांचं निधन झालं आहे. ते ८० वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोगामुळे त्रस्त होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. WWE ने ट्विटरवरुन त्यांच्या निधनाची बातमी दिली. बॉब आर्मस्ट्राँग यांच्या निधनामुळे रेसलिंग चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

बॉब आर्मस्ट्राँग हे १९६०-७०च्या दशकातील एक सुपरस्टार रेसलर म्हणून ओळखले जायचे. त्यांचं खरं नाव जोसेफ जेम्स असं होतं. परंतु रेसलिंगच्या जगात त्यांना बॉब आर्मस्ट्राँग या नावामुळे लोकप्रियता मिळाली. खरं तर त्यांनी एक बॉडी बिल्डर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण १९५५ साली त्यांना एका सेलिब्रिटी रेसलिंग मॅचचं आमंत्रण मिळालं आणि रातोरात त्यांचं आयुष्यच बदललं. या मॅचमध्ये त्यांनी केलेली फायटिंग प्रेक्षकांना प्रचंड आवडली. परिणामी यापुढे रेसलिंगमध्येच करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर जवळपास पाच वर्ष त्यांनी रेसलिंगचं प्रशिक्षण घेतलं. आणि १९६० साली त्यांनी प्रोफेशनल रेसलर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. १९८० ते १९८८ दरम्यान ते WWF मध्ये रेसलिंग करत होते. अनोख्या फाईटिंग स्टाईलमुळे WWF मध्ये त्यांना ‘बुलेट बॉब’ म्हटलं जायचं.

१९८८ साली पाठीच्या दुखापतीमुळे त्यांनी रेसलिंगमधून निवृत्ती घेतली. २०११ साली WWE ने ‘हॉल ऑफ फेम’ खेळाडूंच्या पंक्तीत स्थान देत त्यांचा सत्कार केला होता. WWE सुपरस्टार बॉब आर्मस्ट्राँग यांच्या निधनामुळे रेसलिंग चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 12:07 pm

Web Title: wwe hall of famer bullet bob armstrong dies at 80 mppg 94
Next Stories
1 ‘ड्रग्सविषयीचे चॅट मीच टाइप केले होते’; रियाची कबुली
2 प्रसारमाध्यमांवर रियाची आगपाखड; कॅमेरा पाहून दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन
3 ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात ‘आनंदी गोपाळ’, ‘आटपाडी नाइट्स’चं वर्चस्व
Just Now!
X