डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार आणि अभिनेता जॉन सीना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामागील कारण म्हणजे त्याने बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. जॉनने इन्स्टाग्रामवर ऋषी कपूर यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल रोजी मुंबईमधील रूग्णालयात निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते.

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. त्यांना २९ तारखेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासहीत क्रिडा, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सोशल नेटवर्किंगवर श्रद्धांजली अर्पण केली.  “ऋषी कपूर हे बहुआयामी, प्रेमळ आणि उत्साही व्यक्तीमत्व होते. ऋषी कपूर म्हणजे प्रतिभा संपन्नतेचे शक्तीस्थळ. सोशल मीडियासह इतरवेळी त्यांच्याबरोबर झालेला सुसंवाद मला नेहमी आठवेल. भारताची प्रगती आणि चित्रपटांबद्दल त्यांना प्रचंड कळकळ होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने दु:ख झालं आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली अर्पण करताना होतं. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी “ऋषी कपूर यांचे आकस्मिक निधन धक्कादायक आहे. ते एक एव्हरग्रीन पर्सनॅलिटी होते. त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक हास्य असायचं. ते कायम उत्साही असायचे. ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीला मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी प्रार्थना करुयात. त्यांच्या कुटुंबिय आणि मित्र परिवाराचे मी सांत्वन करतो,” अशा शब्दांमध्ये ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सीनानेही आपल्या इन्स्टाग्रामवर ऋषी कपूर यांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला जॉनने कोणतीच कॅप्शन दिलेली नाही. विशेष म्हणजे जॉनची कोणत्याही भारतीय कलाकाराशी किंवा क्रिकेट विश्वातील व्यक्तीशी खास ओळख नाहीय. तरीही तो अनेकदा भारतीय मनोरंजन सृष्टीसंदर्भातील फोटो पोस्ट करताना दिसतो. अशाच प्रकारे त्याने ऋषी कपूर यांचे निधन झाले त्याच दिवशी त्यांचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on

जॉनने आपल्या इन्स्टा बायोमध्येच येथील फोटो तुमच्या इच्छेनुसार समजून घ्या असं म्हटलं आहे. ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या इन्स्टाग्रामवर तुमचे स्वागत आहे. येथील फोटो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार समजून घ्या. येथे मी फोटो कॅप्शन आणि स्पष्टीकरणाशिवाय पोस्ट करणार आहे. या फोटोंचा आनंद घ्या,’ असं जॉन आपल्या इन्स्टा बायोत म्हणतो.

दरम्यान जॉनने अशाप्रकारे लोकप्रिय भारतीय व्यक्तींचे फोटो याआधीही शेअर केले आहेत. त्याने शिल्पा शेट्टी आणि डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार स्टोन कोल्डचा फोटोशॉप केलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. तसेच मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याने अभिनेता सुशांत सिंह राजपूतचाही फोटो शेअर केला होता.

सुशांत सिंगचा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on

शिल्पा आणि स्टोन कोल्डचा फोटोशॉप केलेला फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on

याबद्दल शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर कमेंटही केली होती. ‘मी नक्कीच जॉन सिनाला अद्याप पाहिलेले नाही तरी हा फोटो एकदम वेगळा आहे,’ असं शिल्पा म्हणाली होती. याआधी जॉनने गायक दिलेर मेहंदी, कपिल शर्मा आणि रणवीर सिंहचाही फोटो पोस्ट केला होता. इतकचं नाही तर १५ ऑगस्टला त्याने भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा फोटोही पोस्ट केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on

अनेकदा जॉनला फोटोमधून काय म्हणायचं असतं हे कळत नाही त्याच्या फॉलोअर्सला मात्र ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दिवशीच त्याने त्यांचा फोटो शेअर केल्याने अनेक भारतीय चाहत्यांनी त्याचे कौतुक केलं आहे.