News Flash

पँट घातली नसल्याने यामी गौतमच्या बहिणीला काढलं रेस्टॉरंटबाहेर

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमची बहिण सुरिली एका रेस्टॉरंटमध्ये गेली असता तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमची बहिण सुरिली एका रेस्टॉरंटमध्ये गेली असता तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पँट घातली नसल्याचं सांगत सुरिलीला रेस्टॉरंटच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. सुरिली आपली बहिण यामी गौतमसोबत ‘उरी’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेरबियामध्ये आहे. यानंतर यामी गौतमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर व्हिडीओ शेअर केला असून, आपल्या बहिणीला रेस्टॉरंटमध्ये का प्रवेश दिला नाही हे सांगायला सांगत आहे.

या घटनेमुळे यामी गौतम आणि सुरिली प्रचंड चिडल्या असतील असा विचार करत असाल तर तसं काही झालेलं नाहीये. दोघी बहिणी सेरबियामध्ये मजा मस्ती करत असून आपले फोटो सोशल मीडियावर शेअऱ करत आहेत. व्हिडीओतही दोघी ही घटना मस्करीत घेत असल्याचं दिसत आहे.

सुरिली राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात रणदीप हुडा मुख्य भुमिकेत असणार आहे. आपल्या बहिणीच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी आपण प्रचंड उत्सुक असल्याचं यामीने सांगितलं होतं. चित्रपटाचं शुटिंग अद्याप सुरु झालं नसल्याने सुरिली सध्या यामीसोबत उरी चित्रपटाच्या सेटवर वेळ घालवत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 5:45 am

Web Title: yami gautam sister surilee asked to leave restaurant for not wearing pant
Next Stories
1 ‘क्वांटिको’मधील हिंदू टेरर प्लॉटवरून हॉलिवूड निर्मात्याची दिलगिरी
2 काश्मिरमध्ये जीपला बांधलेल्या फारूक दारला बिग बॉसमध्ये 50 लाखांची ऑफर
3 लग्नाच्या दीड महिन्यानंतर नेहा-अंगद देणार ग्रँड रिसेप्शन
Just Now!
X