बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम लग्न बंधनात अडकली आहे. यामीने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केल्याची माहिती दिली आहे. यामीने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत आज ४ जून रोजी लग्न केल्याची माहिती दिली आहे. सध्या यामी आणि आदित्यचा लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी यामीला शुभेच्छा दिल्या आहेत.

यामीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली असून ती अतिशय सुंदर दिसत आहे. तर आदित्यने सफेद रंगाची शेरवानी परिधान केली आहे. लग्नातील फोटो शेअर करत यामीने ‘कुटुंबीयांच्या आशिर्वादाने आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा पार पाडला आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

पाहा : मराठी चित्रपटसृष्टीमधील ‘सेलिब्रिटी सिस्टर्स’, जाणून घ्या ‘या’ सख्या बहिणींविषयी

करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यामीने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले आहे. सध्या त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकजण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन, वाणी कपूर, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन, ताहिरा कश्यप अशा अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

यामी आणि आदित्यने २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.