एकेकाळी आपल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे दिग्दर्शक,निर्माते म्हणजे यश चोप्रा. २१ ऑक्टोबर रोजी जगाचा निरोप घेणाऱ्या यश चोप्रा यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला. त्यामुळे आजही त्यांच्या चित्रपटांना तितकीच पसंती मिळते. विशेष म्हणजे सुंदर प्रेमकथा उलगडणारे यश चोप्रा खऱ्या आयुष्यातदेखील एका अभिनेत्रीच्या प्रेमात होते. विशेष म्हणजे या अभिनेत्रीसोबत ते लग्नदेखील करणार होते. मात्र, काही त्यांचं लग्न एका खास कारणामुळे होऊ शकलं नाही.

६० ते ७०च्या दशकात यश चोप्रा आणि अभिनेत्री मुमताज यांच्या अफेअरच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता. त्याकाळी मुमताज यांच्या सौंदर्यावर अनेक जण घायाळ होतो.मात्र, मुमताज या यश चोप्रा यांच्या प्रेमात होत्या असं म्हटलं जातं. खरंतर या दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. त्यामुळेच त्यांनी लग्न करण्याचादेखील निर्णय घेतला होता.

‘आदमी और इंसान’ या चित्रपटात अभिनेत्री सायरा बानो यांची मुख्य भूमिकेसाठी तर मुमताज यांची सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. मात्र प्रेमापोटी यश यांनी चित्रपटात मुमताजसाठी एक स्पेशल गाणे चित्रीत केले होते. या चित्रपटानंतर मुमताज आणि यश यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

यश आणि मुमताज यांच्या रिलेशनच्या चर्चा कानावर आल्यानंतर यश यांचे भाऊ बी. आर. चोप्रा हे मुमताजच्या घरी गेले आणि त्यांनी यशसाठी लग्नाची मागणी घातली. लग्नानंतर मुमताज यांना त्यांचे करिअर सोडून घर सांभाळावे लागणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी या लग्नाला नकार दिला होता. त्यानंतर मुमताज आणि यश यांच्या रिलेशनला पूर्णविराम लागला.

त्यानंतर काही दिवसांमध्ये यश चोप्रा यांनी पामेला सिंह यांच्याशी लग्न केले. तर दुसरीकडे मुमताज यांनी करिअरवर लक्ष केंद्रीत केले. काही दिवसातच अभिनेते राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र त्यांचे हे रिलेशन फार काळ टिकू शकले नाही. शेवटी मुमताज यांनी एका उद्योगपतीशी लग्न करत फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.