बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. इतकेच नव्हे तर यश चोप्रा यांच्या चित्रपटांमधून अनेक बॉलिवूड कलाकारांना एक वेगळी ओळख देखील मिळवून दिली होती. २१ ऑक्टोबर २०१२ रोजी यश चोप्रा यांनी जगाचा निरोप घेतला.

६० ते ७०च्या दशकात यश चोप्रा यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री मुमताज यांचे नाव यश चोप्रा यांच्यासोबत जोडण्यात आले होते. मुमताज यांनी त्यांच्या अदा, स्टाइल आणि अभिनयाने अनेकांच्या मनावर भुरळ घातली होती. मात्र लाखो मनावर राज्य करणाऱ्या मुमताज यश चोप्रा यांच्या प्रेमात होत्या. यश चोप्रा यांचे देखील मुमताजवर जीवापाड प्रेम होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

‘आदमी और इंसान’ या चित्रपटात अभिनेत्री सायरा बानो यांची मुख्य भूमिकेसाठी तर मुमताज यांची सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. मात्र प्रेमापोटी यश यांनी चित्रपटात मुमताजसाठी एक स्पेशल गाणे चित्रीत केले होते. त्यामुळे चित्रपटात सायरा बानो यांच्या भूमिकेपेक्षा मुमताज यांच्या भूमिकेला जास्त महत्व प्राप्त झाले होते. या चित्रपटानंतर मुमताज आणि यश यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

यश आणि मुमताज यांच्या रिलेशनच्या चर्चा ऐकून यश यांचे भाऊ बी. आर. चोप्रा यांनी मुमताज यांच्या घरी लग्नाची मागणी घातली होती. लग्नानंतर मुमताज यांना त्यांचे करिअर सोडून घर सांभाळावे लागणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी या लग्नाला नकार दिला होता. त्यानंतर मुमताज आणि यश यांच्या रिलेशनला पूर्णविराम लागला.

त्यानंतर काही दिवसांमध्ये यश चोप्रा यांनी पामेला सिंह यांच्याशी लग्न केले. तर दुसरीकडे मुमताज यांनी करिअरवर लक्ष केंद्रीत केले. काही दिवसातच अभिनेते राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र त्यांचे हे रिलेशन फार काळ टिकू शकले नाही. शेवटी मुमताज यांनी एका उद्योगपतीशी लग्न करत फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.