News Flash

प्रतिक्षा संपली! ‘केजीएफ चॅप्टर 2’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

जाणून घ्या, 'केजीएफ चॅप्टर 2’ च्या प्रदर्शनाची तारीख

दाक्षिणात्य चित्रपटांमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे ‘केजीएफ चॅप्टर – १’. तुफान यश आणि लोकप्रियता मिळालेल्या या चित्रपटाच्या सिक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळेच ‘केजीएफ चॅप्टर 2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही दिवसांपूर्वीच त्याचा टीझर प्रदर्शित झाला होता.

दाक्षिणात्य सुपरस्टार यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ चॅप्टर 2’ च्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. शुक्रवारी या चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. या पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ठरलेला ‘केजीएफ चॅप्टर 2’ हा चित्रपट १६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

आणखी वाचा- ‘रामायण’ पुन्हा पडद्यावर; बिग बजेट चित्रपटात दीपिका-हृतिकची वर्णी

दरम्यान, ‘केजीएफ चॅप्टर – १’ हा चित्रपट ज्या ठिकाणी संपला, तेथूनच पुढे केजीएफ चॅप्टर 2 ची कथा सुरु होत आहे. या सिक्वलमध्ये संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 12:21 pm

Web Title: yash starrer kgf chapter 2 arrives on 16 july 2021ssj 93
Next Stories
1 ‘रामायण’ पुन्हा पडद्यावर; बिग बजेट चित्रपटात दीपिका-हृतिकची वर्णी
2 फरहान अख्तरला दिलासा; ‘मिर्झापूर’ प्रकरणावर उच्च न्यायालयाने दिला निर्णय
3 कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत
Just Now!
X