News Flash

यामी गौतम पाठोपाठ ‘ये जवानी…’मधील ‘लारा’ने केले लग्न

एवलिनने सोशल मीडियावर फोटो शेअर करत १५ मे रोजी लग्न केल्याची माहिती दिली आहे.

१५ मे रोजी त्यांनी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे लग्न केले.

सध्या लॉकडाउनच्या काळात अनेक कलाकार लग्न करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री यामी गौतमने ‘उरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केल्याचे समोर आले. आता तिच्या पाठोपाठ ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात लाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री एवलिन शर्माने लग्न केल्याचे समोर आले आहे. एवलिनने १५ मे रोजी लग्न केले आहे. आता तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे.

एवलिनने बॉयफ्रेंड तुशान भिंडीशी लग्न केले आहे. तो ऑस्ट्रेलियात राहत असून एक डॉक्टर आहे. १५ मे रोजी त्यांनी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे लग्न केले. २०१९मध्ये एवलिन आणि तुशानने साखरपुडा केला होता. एवलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ब्रायडल लूकमध्ये सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने ‘फॉरएव्हर’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : अभिनेत्री यामी गौतम अडकली लग्नबंधनात; जाणून घ्या तिच्या पती विषयी

 

View this post on Instagram

 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

लग्नाविषयी बोलताना एवलिन म्हणाली, ‘तुमच्या सर्वात जवळच्या मित्राशी लग्न करणे या पेक्षा कोणतीही चांगली गोष्ट असू शकत नाही. संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

तुशानने एवलिनला सिडनीमधील हार्बर ब्रीजवर प्रपोज केले होते. एवलिनला खूश करण्यासाठी एक खास नोट देखील लिहिली होती. एवलिनने स्वत: याबाबत खुलासा केला होता. तुशान हा ऑस्ट्रीलियामध्ये राहणारा आहे. तो एक डेंटल सर्जन आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 11:38 am

Web Title: ye jawani hai diwani fem evelyn sharma marries to boyfriend tushan bhindi in a private ceremony in australia avb 95
Next Stories
1 “व्हाटस्अप मेसेजवर विश्वास ठेवू नका”, दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर
2 ४६ वर्षांच्या एकता कपूरने सांगितले होते लग्न न करण्यामागचे कारण
3 ट्रोल झाल्यानंतर रॅपर आदित्य तिवारी बेपत्ता, सोशल मीडिया पोस्टमुळे चाहते चिंताग्रस्त
Just Now!
X