एखादा चित्रपट हिट होण्यामागे त्यातील गाण्यांचाही मोलाचं योगदान असतं. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतात पण त्यातील गाणी मात्र सुपरहिट होतात. सरत्या वर्षात बॉलिवूडने प्रेक्षकांना बरीच गाणी दिली. विशेष म्हणजे यावर्षी जुन्या गाण्यांचे रिमेक, त्यामध्ये रॅपची जोड तर काही जुन्या गाण्यांना दिलेला नवीन टच हेच जास्त पाहायला मिळालं. आताच्या तरुणाईला आवडेल असा मॉडर्न टच अनेक जुन्या गाण्यांना दिला गेला आणि ती गाणी हिट ठरली.

या वर्षातील अशाच काही सुपरहिट १० गाण्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. युट्यूबवर सर्वाधिक पाहिली गेलेली ही गाणी आहेत. ज्यामध्ये संगीतकार तनिष्क बागचीने बाजी मारली आहे. ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ या चित्रपटातील ‘बन्नो’ या गाण्याला त्याने संगीतबद्ध केलं. या गाण्यापासून त्याच्या बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात झाली आणि यावर्षी त्याने बरीच सुपरहिट गाणी इंडस्ट्रीला दिली.

‘बद्री की दुल्हनियाँ’, ‘तम्मा तम्मा अगेन’, ‘तू चीज बडी है मस्त’ या गाण्यांनी टॉप १०च्या यादीत स्थान मिळवलं आहे. ही गाणी तनिष्क बागचीनेच संगीतबद्ध केली आहेत. युट्यूबवर भारतात ट्रेण्ड होत असलेल्या टॉप १० गाण्यांच्या व्हिडिओच्या यादीवर एक नजर टाकूयात..

१. ‘बद्री की दुल्हनियाँ’ (चित्रपट- बद्रीनाथ की दुल्हनियाँ)

२. तम्मा तम्मा अगेन (चित्रपट- बद्रीनाथ की दुल्हनियाँ)

३. हाय रेटेड गब्रू (गायक- गुरू रंधावा)

४. डिंग डांग (चित्रपट- मुन्ना मायकल)

५. मेरे रश्के कमर (चित्रपट- बादशाहो)

६. शेप ऑफ यू (गायक- एड शीरन)

७. डेस्पॅसिटो (गायक- लुईस फॉन्सी)

८. गलती से मिस्टेक (चित्रपट- जग्गा जासूस)

९. चीज बडी (चित्रपट- मशीन)

१०. बारीश (चित्रपट- हाफ गर्लफ्रेंड)