News Flash

भरदिवसा अभिनेत्याच्या कारमधून झाली चोरी

मुंबईमधील जुहू येथे ही घटना घडली आहे.

खुशांकने या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘ये हैं चाहते’मध्ये काम करणारा अभिनेता खुशांक अरोराच्या कारमधून दिवसा चोरी झाली आहे. मुंबईमधील जुहू येथे ही घटना घडली आहे. अभिनेत्याने कार पार्किंगमध्ये पार्क केली होती. चोरांनी कारची काच तोडून लॅपटॉप चोरी केला आहे.

खुशांक त्याच्या आगामी प्रोजक्टच्या मिटिंगसाठी जुहू येथे गेला होता. तेथे त्याने एका ठिकाणी पार्किंग एरिआमध्ये कार पार्क केली होती. जवळपास एक तास खुशांकची मिटिंग सुरु होती. मिटिंग संपल्यानंतर तो कार जवळ आला. त्यावेळी कारच्या एका बाजूच्या खिडकी जवळची काच तुटलेली त्याला दिसली. त्यानंतर खुशांकने कारमध्ये ठेवलेला लॅपटॉप आहे की नाही हे पाहिले. तेव्हा चोरांनी कारची काच तोडून लॅपटॉप चोरी केल्याचे कळाले. खुशांकने या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KHUSHANK ARORA (@misterkhushank)

आणखी वाचा : ‘कपिल शर्मा शो’मधील सुमोन २०११ पासून ‘या’ आजाराने आहे त्रस्त

खुशांकने आगामी प्रोजक्टची मिटिंग संपल्यानंतर कामानिमित्त अंधेरी येथील लोखंडवाला येथे गेला होता. त्याच्या रेस्टॉरंटची मिटिंग होती. लॉकडाउनमुळे बंद असलेले रेस्टॉरंट जुलै महिन्यात पुन्हा सुरु करण्याच्या संदर्भात ही मिटिंग होती. ती मिटिंग संपताच त्याने पोलिसात जाऊन लॅपटॉप कारमधून चोरी झाल्याची तक्रार केली. गेल्या काही दिवसांपासून खुशांक छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये हैं चाहते’मध्ये काम करत आहे. तो कबीर ही भूमिका साकारत आहे. मालिकेत कबीर हे पात्र निगेटिव्ह दाखवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 9:00 am

Web Title: yeh hain chahatein fame khushank arora robbers car steal laptop avb 95
Next Stories
1 करिश्माला पतीने केला होता विकण्याचा प्रयत्न
2 जेव्हा मुलाने आत्महत्या केली तेव्हा कोलमडून गेलो होतो…; कबीर बेदींनी व्यक्त केलं दुःख
3 शबाना आझमी यांना दारूची होम डिलिवरी पडली महागात; मुंबई पोलिसांकडे मागितली मदत
Just Now!
X