‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’फेम अभिनेत्री दिव्या भटनागर हिला करोनाची लागण झाली आहे. दिव्याची प्रकृती सध्या नाजूक असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. दिव्याच्या आईने ‘टाइम्स ऑफ इंडिया’सोबत बोलताना ही माहिती दिली. नुकतेच तिचे आई व भाऊ मुंबईत आले आहेत.
“गेल्या ६ दिवसांपासून दिव्याची प्रकृती खालावली आहे. तिला बरं वाटत नाहीये. दिव्याच्या आजारपणाविषयी समजल्यानंतर मी दिल्लीवरुन घरी आले आणि दिव्याची ऑक्सिजनची पातळी तपासली. त्यावेळी तिची ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी झाली होती. सध्या ती व्हेटिलेटरवर असून तिची प्रकृती नाजूक आहे. नुकतेच तिचे रिपोर्ट आले आहेत, ज्यात तिला करोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे”, असं दिव्याच्या आईने सांगितलं.
View this post on Instagram
पुढे त्या म्हणतात, “दिव्या सध्या ‘तेरा यार हूं मै’ या मालिकेत काम करत असून शशी-सुमित प्रोडक्शनने आम्हाला आर्थिक मदतदेखील केली आहे. माझा मुलगा त्यांच्या संपर्कात आहे”.
दरम्यान, काही दिवसापूर्वी दिव्याने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला होता. यात ती रुग्णालयात होती. तसंच तिच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क होता. दिव्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘तेरा यार हूँ मैं’ या मालिका विशेष गाजल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2020 1:13 pm