News Flash

अभिनेत्री मोहेना कुमारीला झाली करोनाची लागण; कुटुंबियांसह १७ जाणांना केलं क्वारंटाईन

'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील अभिनेत्रीला झाली करोनाची लागण

करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सर्वसामान्य लोकांसोबतच आता अनेक सेलिब्रिटी देखील करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. करोनाग्रस्त सेलिब्रिटींच्या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मोहेना कुमारी हिला देखील करोना विषाणूची लागण झाली आहे. परिणामी तिच्या कुटुंबियांसह आणखी १७ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

मोहेना उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांची सुन आहे. सतपाल यांना करोना विषाणूची लागण झाली होती. परिणामी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची करोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये मोहेनासह आणखी १७ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. त्यामुळे या सर्वांना आता क्वारंटाईन करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

मोहेना कुमारी एक टीव्ही अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमधून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तिने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ‘सिलसिला प्यार का’ या मालिकेत देखील झळकली होती. मोहेना एक डान्स कोरोग्राफर देखील आहे. तिने ‘डान्स इंडिया डान्स’ या शोमधील स्पर्धकांसाठी कोरोग्राफी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 4:48 pm

Web Title: yeh rishta kya kehlata hai actress mohena kumari covid 19 test positive mppg 94
Next Stories
1 अझरसारख्या खेळाडूशी लग्न करायला आवडेल की…, शाहरुखने विचारला होता प्रियांकाला प्रश्न
2 “नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मतदान करणार नाही”; डोनाल्ड ट्रम्प यांना गायिकेने दिली धमकी
3 “त्या कठीण काळातून मी बाहेर येईन असं वाटलं नव्हतं”; परिणीतीने सांगितला नैराश्याचा अनुभव
Just Now!
X