19 September 2020

News Flash

‘अक्षरा’च्या आवाजातील ‘वंदे मातरम्’ ऐकलंत का?

हिनाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला.

अभिनेत्री हिना खान

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील ‘अक्षरा’ तुम्हाला माहितच असेल. मालिकेत हिनाने साकारलेली आदर्श सूनेची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेल्या या मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली. हिनाचे अभिनय कौशल्य तर सर्वांना ठाऊकच आहे, मात्र फार कमी लोकांना हे माहित आहे की ती एक चांगली गायिकाही आहे. स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने हिनाने तिच्या आवाजातील ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीताचा एक व्हिडिओ पोस्ट केला.

हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओला सोशल मीडियावर अनेकांकडून लाइक्स मिळत असून ९६ हजारहूनही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘तुम्हा सर्वांना स्वातंत्रदिनाच्या खूप शुभेच्छा. फार कमी वेळात हे गीत रेकॉर्ड केलंय. तुम्हा सर्वांना आवडेल अशी अपेक्षा आहे.’

View this post on Instagram

Happy Independence Day🇮🇳 #jaihind

A post shared by HK (@realhinakhan) on

मालिका सोडल्यानंतर हिना पाच महिन्यांच्या ब्रेकनंतर सध्या ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये स्टंट्स करताना दिसतेय. या शोमध्ये टास्कदरम्यान तिने ‘लग जा गले’ हे गाणं गायलं होतं. तिने गायलेलं हे गाणं शोचा सूत्रसंचालक रोहित शेट्टीलाही खूप आवडलं होतं. त्यानंतर अनेकदा रोहितने शोमध्ये तिला ते गाणं गायला सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 9:15 am

Web Title: yeh rishta kya kehlata hai fame hina khan singing vande mataram
Next Stories
1 ‘त्या’ प्रसंगाबद्दल अक्षयने मानले हृतिकचे आभार?
2 आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचं ब्रेकअप
3 …म्हणून नवज्योत सिंग सिद्धू कपिल शर्मावर भडकले!
Just Now!
X