स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. सुरुवातीला हिना खानने ही मालिका गाजवली. त्यानंतर ही मालिका एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यातील कार्तिक आणि नायरा या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. मालिकेत काम करता करता हे दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले.

अभिनेत्री शिवांगी जोशी आणि मोहसिन खान हे नायरा आणि कार्तिकची भूमिका साकारत आहेत. मालिकेतील या दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. रिल लाइफ कपल साकारल्यानंतर आता शिवानी आणि मोहसिन खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वीच मोहसिन आणि शिवांनीने स्वत: त्यांच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला होता.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”
chatura article loksatta, true love marathi news, true love mother father
‘आई, बाबांचं तुझ्यावर प्रेम नाही का?’

https://www.instagram.com/p/BziAE0TFezE/

आणखी वाचा : नागा-चैतन्य व साई पल्लवीच्या ‘लव्ह-स्टोरी’वर समंथा नाराज?

शिवांगीचा निरागसपणा मला खूप भावतो, अशा शब्दांत मोहसिनने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. शिवांगीसुद्धा आता मोकळेपणाने मोहसिनसोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करू लागली आहे. शिवांगी-मोहसिनने अनेकदा ‘सर्वोत्कृष्ट जोडी’चा पुरस्कार पटकावला आहे. या दोघांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.