21 January 2021

News Flash

‘ये रिश्ता क्या केहलाता है’चं शुटींग बंद? आणखी दोन कलाकारांची करोना चाचणी पॉझिटीव्ह

काही कलाकारांनी स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन केले आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘ये रिश्ता क्या केहलाता है.’ या मालिकेतील तीन कलाकरांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. तसेच मालिकेतील इतर कलाकारांनी देखील स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे.

काही दिवसांपूर्वीच मालिकेत मनिष गोयंकाची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन त्यागीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यांनतर आणखी दोन कलाकार म्हणजेच समीर ओनकर आणि स्वाती चिटनिस यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

सचिन त्यागी, समीर ओनकर आणि स्वाती चिटनिस यांना सध्या होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच मोहसिन खान (कार्तिक) , शिवांगी जोशी आणि मालिकेतील इतर कलाकारांनी स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन करुन घेतले आहे. तसेच प्रोडक्शन हाउसने सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांची करोना चाचणी करुन घेतली. पण त्यांचे करोना रिपोर्ट अद्याप आले नसल्याचे म्हटले जात आहे.

तसेच ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या मालिकेच्या सेटवरील सर्वांची करोना चाचणी करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी त्यांच्या मालिकेतील एका अभिनेत्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 3:38 pm

Web Title: yeh rishta kya kehlata hai shoot stopped after three actors found corona positive avb 95
Next Stories
1 ‘बिग बॉस’चं १४ वं पर्व लांबणीवर; ‘या’ कारणामुळे थांबवलं चित्रीकरण
2 लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळात सेलिब्रिटीचं रक्तदान
3 अक्षयने करीनाच्या अंगावर फेकला कॉफी मग?, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X