येमेनमध्ये एका मॉडेल आणि अभिनेत्रीचं अपहरण करून तिचा छळ केल्याची घटना घडली आहे. या अभिनेत्रीवर होणारा छळ ऐकून कुणालाही धक्का बसले. इंतिसार अल हम्मादी असं या 20 वर्षीय अभिनेत्रीचं नाव असून अपहणानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आलाय. मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या एमनेस्टी इण्टरनॅशनल या संस्थेने एका निवेदनातून याबद्दलची माहिती प्रकाशीत केली आहे.

इंतिसारचं अपहरण करून तिच्यावर कौमार्य चाचणी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं इंतिसारच्या वकिलांनी म्हंटलं आहे. 20 फेब्रुवारीला येमेनची राजधानी असलेल्या सना इथून इंतिसारला हौथी बंडखोरांनी ताब्यात घेतलं होतं . तेव्हा पासूनच ती येमेनमधील सनामध्ये सत्ता गाजवणाऱ्या हौथी या विद्रोहक संस्थेच्या ताब्यात आहे.

कौमार्य चाचणीसाठी दबाव

दोन महिन्यांनंतर एमनेस्टी इण्टरनॅशनल या संस्थेने एक निवेदन प्रकाशित केलं. यात सांगण्यात आलंय की 20 वर्षीय इंतिसारला ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली, तिचा छळ करण्यात आला असून तिला ड्रग्सचं सेवनं आणि वैश्या व्यवसाय करत असल्याची कबुली देण्यास भाग पाडलं. त्यानंतर इंतिसारला ती कुमारिका असल्याचं सिद्ध करण्यासाठी कौमार्य चाचणी देण्यास दाबव टाकला जात असल्याचं वकिलांकडून सांगण्यात आलंय.

येमिनी-इथोपियन असलेल्या इंतिसारला हौथी बंडखोरांकडून अटक करण्यात आली होती. यमेनमध्ये बहुतांश भाग हौथी बंडखोरांनी ताब्यात घेतला आहे. त्यानंतर इथल्या हादी सरकारने सौदी अरेबियात पळ काढला आहे. राजधानी सनावर या बंडखोरांचं नियंत्रण असून देशातील नैतिकतेसाठी ते कार्यरत आहेत. अपारंपिक म्हणजेच मॉर्डन कपडे परिधान करत असल्याने आणि अनेकदा मुस्लिम समजातील हिजाब परिधान न केल्याने इंतिसार अल हम्मादीला लक्ष्य केलं गेल्याचं एमनेस्टी इण्टरनॅशनलच्या निवेदनात म्हंटलं आहे.

डोळ्यावर पट्टी बांधून अत्याचार
दोन महिन्यांपूर्वी हम्मादीला रस्त्यावरून जात असताना अटक करण्यात आलं. सना शहरात तिची गाडी थांबवण्यात आली आणि तिला ताब्यात घेण्यात आलं. गाडीत गांजा असल्याचा आरोप करत हौथीच्या सैन्य दलाने तिला अटक केली. एमनेस्टी इण्टरनॅशनल या संस्थेच्या दाव्यानुसार हम्मादीच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. त्यानंतर तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत तिची चौकशी केली गेली. वर्णभेद करत तिचा अपमान करण्यात आला. तसचं डोळ्यावर पट्टी असतानाच तिच्याकडू काही आरोप पत्रांवर जबरदस्तीने सही आणि अंगठ्याचा शिक्का घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. ज्यात ती ड्रग्सचं सेवन करण्यात आल्याचं लिहिण्यात आलंय.

दरम्यान सोशल मीडियावरून अनेकांनी इंतिसार अल् हम्मादीचे फोटो शेअर करत तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल संताप व्यक्त केलाय.

अभिनेत्रीचा छळवाद

एमनेस्टी इण्टरनॅशनल संस्थेच्या निवेदनानुसार कारावासात असताना इंतिसारला मध्य रात्री उठवून विविध घरात नेलं जात असून तू कुठे वेश्याव्यवसाय करायची असं विचारत छळ केला जातो असं संस्थेने म्हंटलंय. हौथी बंडखोरांच्या सुरक्षा दलाने तिला 10 दिवसांनंतर सनामधील मध्यवर्ती कारागृहातील महिला विभागात कैदैत ठेवलं आहे. तसचं कुटुंबियांना आणि वकिलाला भेटण्यास तिला बंदी घालण्यात आली आहे. एवढचं नाही तर हौथी बंडखोरांकडून इंतिसारच्या वकिलांनी केस सोडून द्यावी यासाठी धमक्या दिल्या जात आहेत.

दरम्यान एमनेस्टी इण्टरनॅशनल या मानवी हक्कासाठी लढणाऱ्या संस्थेने इंतिसारचा छळ थांबवणं आणि तिला त्वरित कैदेतून मुक्त करणं गरजेचं असल्याचं म्हंटलं आहे.