News Flash

Video: “पोटभर खाणं हेच माझं डाएट”

रॅपीड फायरमध्ये अन्विताची धमाल

झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची जोडी चाहत्यांचं मनं जिकंतेय. या मालिकेतील स्वीटू आणि ओम या जोडीने म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री अन्विता फलटणकर यांनी नुकतीच लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिट अड्डामध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री अन्विता फलटणकरच्या रॅपीड फायर फेरीत तिचे काही खास सिक्रेट जाणून घेता आले. तसचं अन्विताने विचारलेल्या प्रश्वांची धमाल उत्तर दिली आहेत. यावेळी नृत्य आणि अभिनयात काय निवडणार? या प्रश्नावर मात्र तिचा चांगलाच गोंधळ उडाला.

येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. स्वीटू आणि ओमसोबतच मालिकेतील स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी ही पात्रदेखील प्रेक्षकांचं भरभरून मनोरंज करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 5:21 pm

Web Title: yeu kashi tashi nandayla sweetu anvita faltankar rapid fire round fun video kpw 89
Next Stories
1 ‘बॅकवॉटर्स’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 “लस कुठे उपलब्ध आहे ते सांगा?”; ‘त्या’ सेलिब्रिटींना निया शर्माचा सवाल
3 सलमानच्या ‘राधे’मध्ये जॅकलिनची एण्ट्री, ‘दिल दे दिया है’ गाणे प्रदर्शित
Just Now!
X