उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली आहे. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज आहे. आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेवर चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी आनंद व्यक्त केला. हा एक उत्कृष्ट निर्णय आहे, असं म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं.

अवश्य पाहा – आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण…

“उत्तर प्रदेशमध्ये चित्रपट निर्मितीचे औद्योगिकरण करण्याचा हा निर्णय चांगला आहे. अशी इंडस्ट्री उभारण्यासाठी सर्वांचं समर्थन आणि पायाभूत सुविधा असणं गरजेचं आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन अनुभव सिन्हा यांनी घोषणेचं कौतुक केलं. सर्वसाधारपणे अनुभव सिन्हा भाजपा सरकारच्या घोषणेंवर जोरदार टीका करतात. या पार्श्वभूमीवर त्यांचं हे ट्विट मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – “बॉलिवूडमध्ये ड्रग्स कोणी भरवत नाही”; कंगनाच्या आरोपांना श्वेता त्रिपाठीचं प्रत्युत्तर

योगी आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे विविध जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी नव्या फिल्म सिटीची घोषणा केली. देशाला एका चांगल्या फिल्म सीटीची गरज आहे. उत्तर प्रदेश ही जबाबदारी घेण्यास तयार आहे. आम्ही येथे एक भव्य फिल्म सिटीची उभारणी करु. फिल्मसिटीसाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवेचे क्षेत्र चांगले ठरेल. ही फिल्म सिटी चित्रपट निर्मात्यांना चांगली संधी मिळवून देणार आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. लवकरच यावर काम सुरु करण्यात येईल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते.