25 February 2021

News Flash

वादग्रस्त वक्तव्यामुळे युवराज सिंगच्या वडिलांची ‘या’ चित्रपटातून हकालपट्टी

शेतकरी आंदोलनादरम्यान योगराज सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असतात. शेतकरी आंदोलनादरम्यान योगराज सिंग शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पोहोचले होते. परंतु हिंदूंबाबत केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी केली जात होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना चित्रपटातून काढण्यात आले आहे.

सध्या चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या आठवड्यात चित्रपटाच्या चित्रीकरणासही सुरुवात करण्यात आली आहे. या चित्रपटात विवेक अग्निहोत्रीने योगराज सिंग यांना एक महत्त्वपूर्ण भूमिकेची ऑफर दिली होती. पण सध्या दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर योगराज सिंग यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.

योगराज सिंग यांचा शेतकरी आंदोलनातील भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी हिंदू आणि हिंदू महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली. मात्र त्यांना त्यांच्या वक्तव्यामुळे चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 1:23 pm

Web Title: yograj singh dropped from vivek agnihotri film kashmir files avb 95
Next Stories
1 नेहा कक्करने खाल्ली कारलं आणि कडुलिंबाचा ज्यूस असलेली पाणीपुरी, व्हिडीओ व्हायरल
2 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रजनीकांत यांना दिल्या ट्विटरद्वारे शुभेच्छा, म्हणाले…
3 Video : कोरिओग्राफर पुनितच्या लग्नात भारतीचा पतीसोबत जोरदार डान्स; नेटकरी म्हणाले….
Just Now!
X