माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडिल योगराज सिंग आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. शेतकरी आंदोलनादरम्यान योगराज सिंग शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पोहोचले होते. परंतु तेथे त्यांनी “हे हिंदू गद्दार आहेत. शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केली,” अशा आशयाचं वादग्रस्त भाषण केलं. या भाषणामुळे संतापलेल्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यानं त्यांची आपल्या चित्रपटातून हकालपट्टी केली आहे. शिवाय अशा प्रवृत्तीची लोक सामाजिक हिंसेला खतपणी देतात असा टोला देखील त्याने योगराज सिंग यांना लगावला आहे.

अवश्य पाहा – VIDEO: तारक मेहतामध्ये नव्या दयाबेनची एण्ट्री; जेठालालसोबत रंगली अशी केमिस्ट्री

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत विवेकनं योगराज सिंग यांच्या भाषणावर संताप व्यक्त केला. तो म्हणाला, “योगराज आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत तरी देखील द कश्मीर फाईल्स या चित्रपटासाठी मी त्यांची निवड केली. कारण मी कलाकाराच्या राजकीय मतांना चित्रपटापासून दूर ठेवतो. पण त्यांचं ते भाषण ऐकलं अन् मी अवाक झालो. कुठलाही व्यक्ती महिलांबाबत असा विचार करु शकत नाही. त्यांनी काय म्हटलं यापेक्षा कशा पद्धतीने म्हटलं हे आश्चर्यचकित करणारं आहे. त्यांनी जाणीवपूर्वक दोन जमाजांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळेच समाजात हिंसा निर्माण होते. त्यामुळे त्यांना मी माझ्या चित्रपटातून देखील काढून टाकलं आहे.”

अवश्य पाहा – दाक्षिणात्य अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; पहिल्याच चित्रपटात करतेय अजयसोबत रोमान्स

अनेकांनी योगराज सिंग यांचं हे भाषण नींदनीय, अपमानजनक आणि घृणा आणणारं असल्याचं म्हटलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये योगराज सिंग हे पंजाबी भाषेत बोलत आहे. यादरम्यान त्यांनी हिंदूंसाठी गद्दार या शब्दाचाही वापर केला. “हे हिंदू गद्दार आहे. शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केली,” असंही ते यात म्हणताना दिसत आहे. तसंच महिलांबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यापूर्वी योगराज सिंग हे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते.