28 November 2020

News Flash

‘यू गॉट मॅजिक विथ नील माधव’सह जादुई प्रवासाचा आनंद घेण्‍यास सज्ज व्हा!

हा शो १९ नोव्‍हेंबरपासून रात्री १० वाजता सोनी बीबीसी अर्थवर प्रसारित होणार आहे.

एक व्यक्ती, सात शहरे आणि भारतभरातील जादुई घटक शोधण्‍याचा रोमहर्षक प्रवास. भारताचा आघाडीचा इल्‍युशनिस्‍ट नील माधव सोनी बीबीसी अर्थवरील ‘यू गॉट मॅजिक विथ नील माधव’च्‍या नवीन सीझनमध्ये त्‍याच्‍या हजारो नवीन युक्‍त्यांसह परतला आहे. यावेळी शोमध्ये नील देहरादून, केरळ, उत्तराखंड, अहमदाबाद, आग्रा, देवगड व चंदिगड अशा ठिकाणांच्‍या संस्‍कृतीला दाखवण्‍यासोबत रहस्‍यमय गोष्टींचा उलगडा करताना पाहायला मिळणार आहे. ‘यू गॉट मॅजिक विथ नील माधव’ हा शो १९ नोव्‍हेंबरपासून रात्री १० वाजता सोनी बीबीसी अर्थवर प्रसारित होणार आहे.

भारताच्‍या कानाकोप-यात प्रवास करत नील भारताच्‍या संपन्‍न संस्कृतीला दाखवतो आणि समोर येणा-या प्रत्‍येक घटकामधील जादुई बाबीचा शोध घेतो. या शोच्या अनुभवाबाबत नीलने सांगितलं, “उत्तराखंडमधील नयनरम्‍य टेकड्या, केरळमधील सर्वात प्रसिद्ध कवनाट्टिंकारा बोट रेस, अहमदाबादमधील पतंगोत्सव आणि राजस्थानातील अत्‍यंत सुंदर वास्तुकला, वाडे पाहायला मिळाले. विविध ठिकाणी प्रवास करत माहितीपूर्ण अनुभव घेण्‍याचा, सर्व पार्श्‍वभूमींमधील लोकांना भेटण्‍याचा आणि त्‍यांच्‍याप्रमाणेच माझी कला त्‍यांच्‍यासोबत शेअर करण्‍याचा आनंद अभूतपूर्व राहिला आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 5:21 pm

Web Title: you got magic with neel madhav starting new season ssv 92
Next Stories
1 ‘लक्ष्मी’ चित्रपट पाहता अक्षय ऐवजी शरद केळकरवर नेटकरी फिदा
2 KBC 12: स्पर्धकाने मुलीचे नाव ठेवण्यासाठी बिग बींकडे केली विनंती
3 ‘नग्नता हा गुन्हा असेल तर नागा साधूंना अटक करा’; अभिनेत्रीचा मिलिंद सोमणला पाठिंबा
Just Now!
X