24 November 2020

News Flash

VIDEO : अक्षय, सलमानची ‘ढिंच्याक’ सवारी

'स्कूटर साँग' ऐकून उपस्थितांमध्येही एकच हशा पिकला होता.

बिग बॉस ११

‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वाची सांगता झाली असून, सध्या सोशल मीडिया आणि कलाविश्वातही याच कार्यक्रामाची हवा पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वात काही अतरंगी स्पर्धकांनाही प्रवेश मिळाला होता. त्यातीलच एक नाव म्हणजे ढिंच्याक पूजा. स्वत:ला ‘युट्यूबर’ आणि गायिका म्हणवणारी पूजा ‘बिग बॉस’च्या अंतिम सोहळ्यातही आली होती. यावेळी पुन्हा एकदा तिचा ‘ढिंच्याक’ अंदाज पाहायला मिळाला.

सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या अंतिम सोहळ्यात खिलाडी अक्षय कुमारनेही हजेरी लावली होती. अक्षय त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘बिग बॉस’च्या मंचावर आला होता. पण, त्याच्यासाठी इथे एक वेगळच सरप्राईज वाट पाहात होतं. ते सरप्राईज म्हणजे ढिंच्याक पूजा. पूजाच्या अनोख्या अंदाजातील ‘दिलों का शूटर’ हे गाणे खिलाडी कुमार आणि सलमान खान या दोघांनाही ऐकण्याची संधी मिळाली. त्यावेळी या दोघांच्याही चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे होते. ‘स्कूटर साँग’ ऐकून उपस्थितांमध्येही एकच हशा पिकला होता.

कारण, एका स्कूटरवर पूजा, सलमान आणि खिलाडी कुमार बसलेले दिसत असून, त्यांच्या या प्रवासाला जोड मिळाली ती म्हणजे पूजाच्या गाण्याची. पूजाने गाणे गाण्यास सुरुवात करण्यापूर्वी सलमान आणि अक्षयने तिची ओळख करुन दिली खरी. पण, त्यात उपरोधिकपणा जाणवला. गाण्यातील काहीच ओळी पूजा वारंवार गुणगुणत असल्यामुळे ‘पुढे गाणे म्हण’, असे जेव्हा खिलाडी कुमारने तिला सांगितले तेव्हा, ‘हे गाणे इतकेच आहे’ असेही तिने स्पष्ट केले. पूजाचा हा अंदाज आणि खिलाडी कुमार, सलमानसोबतच्या तिच्या गप्पा या साऱ्याची ट्विटवर बरीच चर्चा पाहायला मिळाली. पूजाला ‘तिची खिल्ली उडवली जातेय याचेही भान नाही का?’, ‘कोणीतरी हिला थांबवा’, ‘काय हा वेडेपणा’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी ट्विट केल्याचे पाहायला मिळाले.

वाचा : पुन्हा चरित्रपटांची लाट!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 2:58 pm

Web Title: you tuber dhinchak pooja rides with bollywood actor salman khan and padman fame akshay kumar on her scooter leaves twitter in splits
Next Stories
1 अखेर ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’साठी प्रभू आला धावून
2 आक्षेपार्ह टिप्पणीमुळे सलमान खान, शिल्पा शेट्टीला समन्स
3 Bigg Boss 11: शिल्पा शिंदेने ‘बिग बॉस’च्या अंतिम सोहळ्यात रचला इतिहास
Just Now!
X