News Flash

अनोळखी व्यक्तीचा मेसेज चुकून वाचला अन् सुरू झाली सुष्मिताची प्रेमकहाणी

सुष्मिता आणि रोहमन यांच्या वयात १५ वर्षांचं अंतर आहे.

सुष्मिता सेन, रोहमन शॉल

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत मॉडेल रोहमन शॉलला डेट करत असल्याचं सांगितलं. तेव्हापासून सुष्मिताच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रोहमनसोबतचे बरेच फोटो पाहायला मिळतात. एका फॅशन शोमध्ये हे दोघे भेटले आणि प्रेमकहाणी सुरू झाली अशी आजपर्यंत चर्चा होती. पण सुष्मितासोबत याउलटच घडलं. आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतात पण त्या तुमच्यासाठी खूप चांगल्या ठरतात असं ती म्हणते. राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिताने तिची आणि रोहमनची प्रेमकहाणी कशी सुरू झाली, याबाबत सांगितलं.

‘त्याने मला इन्स्टाग्रामवर डायरेक्ट मेसेज पाठवला होता. पण इन्स्टाग्रामवरील मेसेज मी कधीच वाचत नाही. त्यामुळे त्या सर्व न वाचलेल्या मेसेजेसमध्ये त्याचासुद्धा एक मेसेज होता. एकदा मुलीसोबत काहीतरी बोलत असताना अचानक डायरेक्ट मेसेजवर क्लिक झालं. रोहमनचा मेसेज मला इतका आवडला की मी लगेच त्याला रिप्लाय दिला,’ असं सुष्मिताने सांगितलं. तेव्हापासूनच मेसेजचा सिलसिला सुरू झाला. त्यानंतर रोहमनने सुष्मिताला त्याचा फुटबॉल मॅच पाहण्यासाठी बोलावलं. ही त्यांची पहिली भेट होती. नंतर सुष्मिताने रोहमनला कॉफीचे आमंत्रण दिले.

वाचा : ऐश्वर्यासोबतच्या ‘कोल्ड वॉर’बाबत सुष्मिता म्हणते..

सुष्मिता आणि रोहमन यांच्या वयात १५ वर्षांचं अंतर आहे. यापूर्वी सुष्मिता हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती, मात्र सुष्मिता रितिकचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. रितिक बरोबरच सुष्मिताचं नाव रणदीप हुडा सोबतही जोडलं गेलं. मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 11:58 am

Web Title: you will be surprised to know how sushmita sen and boyfriend rohman shawl first met read love story
Next Stories
1 वयस्क व्यक्तीची भूमिका साकारण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना तापसीचं सडेतोड उत्तर
2 ऐश्वर्यासोबतच्या ‘कोल्ड वॉर’बाबत सुष्मिता म्हणते..
3 Happy Birthday Ashok Saraf : अशोक सराफ यांना ‘मामा’ का म्हणतात माहितीये?
Just Now!
X