20 January 2018

News Flash

प्रियांका चोप्राचे हे गाणं होतंय तुफान व्हायरल

माझ्या आयुष्यातील एका अनमोल क्षणी हे गाणं लिहीलं

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 12, 2017 8:14 PM

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा हे नुसतं नाव जरी घेतलं तरी अनेकांना तिला नेमकी कोणत्या नावासाठी ओळखावं असा प्रश्न पडतो. आपल्या सौंदर्यासाठी जेवढी ती प्रसिद्ध आहे, तेवढीच प्रसिद्ध ती तिच्या अभिनयासाठीही आहे. बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवल्यानंतर ती निर्मिती क्षेत्रातही उतरली. पण या सगळ्यामध्ये तिने मनापासून एक आवड जपली ते म्हणजे गायन. संगीतात आपण करिअर करावं असा तिचा मानस कधीच नव्हता पण ते ओघाओघाने आलंच.

“Music is love, love is music, music is life, and I love my life. Thank you and good night.” – A.J. McLean An experiment that’s now turned into a reality… how’s that for a surprise!!! I vividly remember sitting in Toby’s studio with Rachel & Ty, and we were just being our creative selves, playing with words, letting each other into our secrets, trying out some melodies…. just surrendering to this crazy thing called song writing!  It’s something I’ve always wanted to do, but never really mustered enough courage to…. But these sessions like the others that followed, were absolutely magical.  And now… lo and behold, Will took the words I wrote and gave it life! Everyday I’m thankful for all the opportunities that have come to me.  I feel truly blessed. Hope you like it. Xoxo #EDM #PlayItLOUD Thank you @will_sparks, @tobygadmusic, #RachelRabin & @tydollasign… It's our time to be #YoungAndFree @billboarddance

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

‘एक्झॉटिक’ आणि ‘इन माय सिटी’ या सुपरहिट गाण्यांनंतर अष्टपैलू अभिनेत्री प्रियांका पुन्हा एकदा आपल्या आवाजात नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हे गाणं युट्युबवर आल्यापासून प्रेक्षकांचा कौतुकाचा वर्षाव तिच्यावर होत आहे. अवघ्या काही दिवसांत हजारो जणांनी या गाण्याला पसंती दर्शविली आहे. ‘यंग अॅण्ड फ्री’ हे गाणं प्रियांकाने स्वतः लिहिले असून ऑस्ट्रेलियातील प्रसिध्द डीजे विल स्पार्कने संगीतबद्ध केले आहे. प्रियांकाने सोशल मीडियावरुन तिचं नवीन गाणं रिलीज झाल्याची बातमी चाहत्यांना दिली. गाण्याप्रतीच्या आपल्या भावना तिने सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

‘मी माझ्या आयुष्यातील एका अनमोल क्षणी हे गाणं लिहीलं होतं. या गाण्याला स्वातंत्र्याच्या उद्देशाने लिहिलेले आहे. मग ते आपल्या आयुष्यातील कोणत्याही बाबतीतील स्वातंत्र्य असेल. तरुण आणि स्वतंत्र्य असणं हे आपल्या मानण्यावर आहे. स्वातंत्र्याची आणि नेहमीच मनाने तरुण असण्याची आपल्या सगळ्यांनाच गरज आहे. मला हे गाणं ज्या पद्धतीने लिहीलं गेलं आहे ते सर्वात जास्त भावलं,’ असे तिने आपल्या गाण्याविषयी बोलताना सांगितले.

First Published on August 12, 2017 8:14 pm

Web Title: young and free check out priyanka chopra new collaboration with will sparks
  1. No Comments.