News Flash

काळा घोडा महोत्सवात तरुणाईचा नाटय़ाविष्कार!

युवा रंगकर्मींच्या विविध नाटय़कृती हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे.

मुंबईच्या सांस्कृतिक विश्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या ‘काळा घोडा महोत्सवा’मध्ये यंदा ‘अस्तित्व’ या संस्थेतर्फे चार नाटय़प्रयोग आणि मुंबई थिएटर गाइडच्या सहकार्याने तीन नाटय़विषयक उपक्रम सादर होणार आहेत. ‘सिनेड्रामा’ हा आगळा प्रयोग सादर होणार आहे. ‘अस्तित्व’न् ो मुंबई थिएटर गाइडच्या सहकार्याने राबवलेल्या ‘ई-नाटय़’ शोध उपक्रमाअंतर्गत ध्वनिचित्रमुद्रित केलेल्या एकांकिका मोठय़ा पडद्यावर दाखविण्यात येणार आहेत. युवा रंगकर्मींच्या विविध नाटय़कृती हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक रवी लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अस्तित्व’-‘कल्चरल शॉक प्रस्तुत’ ‘अगदीच शून्य’ हा दीर्घाक सादर होणार आहे. युगंधर देशपांडे लिखित-दिग्दíशत या दीर्घाकामध्ये अमोल कुलकर्णी,अक्षय िशपी आणि स्वप्निल श्रीराव हे कलाकार आहेत. रविवार ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता नॅशनल गॅलरी फॉर मॉर्डन आर्ट येथे हा प्रयोग सादर होईल. मागच्या वर्षांतील ‘सर्वोत्तम संहिता’ म्हणून गौरविली गेलेली ‘मन्वंतर’ ही एकांकिका पावणेनऊ वाजता सादर होणार आहे. स्वप्निल चव्हाण लिखित व गिरीश सावंत दिग्दíशत या एकांकिकेत वैशाली साळवी, अजित सावंत, माधव शिरसाट, ओमकार जोशी, स्वप्निल टकले, अनिकेत मोरे हे कलाकार आहेत.

सोमवार ८ आणि मंगळवार ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता ‘सिनेड्रामा’ हा आगळा प्रयोग सादर होणार आहे. ‘अस्तित्व’ने मुंबई थिएटर गाइडच्या सहकार्याने राबवलेल्या ‘ई-नाटय़’ शोध उपक्रमाअंतर्गत ध्वनिचित्रमुद्रित केलेल्या एकांकिका मोठय़ा पडद्यावर दाखविण्यात येणार आहेत. ८ फेब्रुवारीला श्रीपाद देशपांडे लिखित आणि सुनील हरिश्चंद्र दिग्दíशत ‘मडवॉक’ तसेच संकेत तांडेल लिखित दिग्दíशत ‘टेराडेक्टीलचे अंडे’तर ९ फेब्रुवारी रोजी वैभव चव्हाण लिखित-दिग्दíशत ‘ऱ्हिदम ऑफ लव्ह’ आणि अंकित गोर लिखित ‘आय वॉन्ट टू ट्वीट’ ही गुजराती एकांकिका सादर होणार आहे.

मराठी रंगभूमीवरील उदयोन्मुख विनोदवीरांना एकत्र आणणारे ‘गोष्ट एका शाळेची’ या विनोदी नाटकाचा प्रयोग अस्तित्व-सकस मुंबई प्रस्तुत १० फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसात वाजता रंगणार आहे. नाटकाचे लेखन संजय सावंत आणि विनोद जाधव यांचे असून सुमित पवार यांनी ते दिग्दíशत केले आहे. संदीप रेडकर, विनोद जाधव, तुषार विचारे, योगेश मोरे, मयूर डली, सुशील रहाते, शेखर बेटकर, संकेत भोसले, केतन साळवी आदी कलाकार नाटकात असून हे नाटक नॅशनल गॅलरी फॉर मॉर्डन आर्ट येथे सादर होणार आहे.

गुजराती रंगभूमीवरील आशयसमृद्ध सशक्त लिखाण करणारी लेखिका म्हणून नावारूपाला आलेल्या सेजल पोंडा यांच्या ‘पीएच.डी.’ नाटकाचे अभिवाचन १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. यंदाच्या ‘ई-नाटय़संहिता’ स्पध्रेत ही नाटिका विजयी ठरली होती. याचे अभिवाचन अभिनेते सनत व्यास आणि स्वत: सेजल पोंडा करणार आहेत. १३ फेब्रुवारी रोजी ‘अस्तित्व’ निर्मित ‘टिकल्या’ हा अभिनव नाटय़प्रयोग सादर होणार आहे. रवी मिश्रा यांची संकल्पना असलेल्या या नाटय़प्रयोगाचे लेखन आणि दिग्दर्शन संकेत तांडेल यांचे आहे. नेत्रा अकुला, श्रद्धा म्हेत्रे, भावेश टिटवळकर, वैभव पिसाट, मनोज कदम, मंगेश उंबरकर हे कलाकार नाटकात आहेत.

जाणत्या मान्यवर दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या युवा रंगकर्मीच्या या नाटय़कृती यंदाच्या काळा घोडा महोत्सवाचे ठळक वैशिष्टय़ आहे. नाटय़रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘अस्तित्व’ने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 3:13 am

Web Title: youth dance in kala ghoda festivals
Next Stories
1 ‘पोश्टर गर्ल’चे ‘पुढचं पाऊल’!
2 राज कपूर यांच्या ‘किसी के मुस्कुराहटों पे’ गाण्याचा रिमेक!
3 कपिल शर्माची नवी ‘कॉमेडी स्टाइल’
Just Now!
X