करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध युट्यूबर, अभिनेता भुवन बाम याला करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

अवश्य पाहा – Halloween Night 2020: सेलिब्रिटींनी अशी साजरी केली ‘भूतांची रात्र’

“गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत खराब आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या विषाणूकडे दुर्लक्ष करु नका. मास्क वापरा, सोशल डिस्टंन्स बाळगा, स्वच्छता राखा अन् स्वत:ची काळजी घ्या” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून भुवनने करोना झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

अवश्य पाहा – ‘मोबाईल रिंगटोनची निवड योग्य करा, अन्यथा…’; बिग बींनी शेअर केलेला व्हिडीओ पाहाच…

Covid-19 : २४ तासांत ४६,९६३ नवीन रुग्ण

देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तर सण-उत्सवानंतर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यात याचा प्रदुर्भाव दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशातील नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजारांच्या आसपास गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ४६ हजार ९६३ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४७० जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संक्या ८१ लाख ८४ हजार ८२ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ७४ लाख ९१ हजार ५१३ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या पाच लाख ७० हजार ४५८ जणांवर उपचार सुरु आहेत. देशातील एकूण करोनाबळींची संख्या एक लाख २२ हजार १११ इतकी झाली आहे.