07 March 2021

News Flash

‘सुपरवुमन’ लिली सिंग म्हणते, ‘बायसेक्शुअल असणे ही तर माझी सुपरपॉवर’

युट्यूबच्या या सुपरवूमनला भेटण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उत्सुक असतात. २०१७ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या फोर्ब्सच्या यादीत लिलीचा समावेश होता.

लिली सिंग

युट्यूब हे संकेतस्थळ तरुणाईमध्ये फारच लोकप्रिय आहे. यूट्यूबवर येणाऱ्या वेबमालिकांमुळे आणि कॉमेडी एपिसोड्समुळे अनेकजण तासन् तास युट्यूबवर सर्फिंग करताना दिसतात. प्रोफेशनल युट्यूबर किंवा फुल टाइम युट्यूबर आहे असं सांगणाऱ्यांकडे हल्ली तरुणाईच्या जगात प्रचंड आदराने आणि कुतूहलाने पाहिलं जातंय. यातीलच एक नाव म्हणजे ‘लिली सिंग अका सुपरवुमन’. तिची एक झलक दिसावी, सही घेता यावी किंवा तिच्यासोबत सेल्फी घेता यावा म्हणून लिलीच्या चाहत्यांची झुंबड उडते. नेटिझन्समध्ये प्रसिद्ध असलेल्या या सुपरवुमनने नुकताच एक खुलासा केला आहे. आपण बायसेक्शुअल असल्याचं लिलीने सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.

आयुष्यात अनेकदा ही गोष्ट मला अडथळा म्हणून समोर आली. पण आता त्याच गोष्टीला मी माझी सुपरपॉवर म्हणून आनंदाने मान्य करते. लिलीच्या या ट्विटनंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला तर अनेकांनी तिने मोकळेपणाने मान्य केल्याचं कौतुक केलं.

लिली तिच्या युट्यूब चॅनलद्वारे कोट्यवधी रुपये कमावते. बॉलिवूडपासून हॉलिवूडच्या कलाकारांना तिच्या या युट्यूब चॅनलवर हजेरी लावण्याची इच्छा असते. २०१७ मध्ये सर्वाधिक कमावणाऱ्या सेलिब्रिटींच्या फोर्ब्सच्या यादीत लिलीचा समावेश होता.

लिली २०१४ साली मुंबईत आलेली तेव्हा शाहरुख खानची मुलगी सुहाना आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून तिला ‘मन्नत’वर आमंत्रित केले होते. त्यावेळी शाहरुखने लिलीसाठी खास तयार करून घेतलेला ब्लेझर भेट स्वरुपात दिला होता. तसेच, आपल्या मुलांप्रमाणे मीही तुझा फॉलोअर असल्याचे शाहरुखने तिला सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 1:17 pm

Web Title: youtuber lilly singh superwoman revealed she is bisexual
Next Stories
1 शाहरूखच्या भेटीची आमिरनं केली अक्षरश: माती
2 सलमान ठरला कॅमिओचा बादशहा; पाहुणा कलाकार असून गाजवले ‘हे’ १० चित्रपट
3 पडद्यावरील कथा सत्यात; अभिनंदनच्या वडिलांच्या आयुष्यातील नकोसा योगायोग
Just Now!
X