News Flash

Yuvraj and Hazel Keech Wedding: ..या दोघांच्या खांद्यावर असेल युवी-हेजलच्या लग्नाची धुरा

क्रिकेटपटू आणि अभिनेत्रीमध्ये होणा-या या लग्नाची थीम ‘युवराज-हेजल प्रीमियर लीग’ अशी आहे.

पंजाबी आणि हिंदू विवाहपद्धतीनुसार हे प्रेमीयुगुल लग्नबंधनात अडकेल.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री हेजल किच हे उद्या विवाहबंधनात अडकतील चंदीगढ येथे पंजाबी विवाहपद्धतीनुसार या दोघांचा विवाह पार पडेल. त्यानंतर पुन्हा २ डिसेंबरला गोव्यात हिंदू विवाहपद्धतीनुसार त्यांचे लग्न होईल. अशाप्रकारे पंजाबी आणि हिंदू विवाहपद्धतीनुसार हे प्रेमीयुगुल लग्नबंधनात अडकेल. या दोघांचे लग्न खूप मनोरंजक असणार आहे. याचा अंदाज त्यांच्या लग्नपत्रिकेवरूनच सर्वांना आला असेल त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेवर कार्टून आणि इलेस्ट्रेशनने डिझाइन करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या लग्नाला एक थीमही देण्यात आली आहे. क्रिकेटपटू आणि अभिनेत्रीमध्ये होणा-या या लग्नाची थीम ‘युवराज-हेजल प्रीमियर लीग’ अशी आहे.

वाचा: युवी-हेजलच्या लग्नात निमंत्रितांच्या यादीत वगळले हे नाव..

वाचा: युवराज सिंगच्या लग्नात वडील राहणार गैरहजर

युवराज आणि हेजलच्या लग्नाच्या तयारीची धुरा डिझायनर सॅन्डी आणि कपिल खुराणा यांनी सांभाळली आहे. या दोघांच्या लग्नाला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं केल्याचे सॅन्डी आणि कपिलने सांगितले. ते म्हणाले की, आम्ही पोस्टल स्टॅम्पही तयार केले आहेत. त्याचसोबत गोव्यात होणा-या लग्नाकरिता खास कार्ड तयार करण्यात आले आहे. त्यावर युवी आणि हेजलचे कार्टून्स काढण्यात आलेले आहेत. चंदीगढमध्ये होणारे लग्न पारंपारिक पद्धतीने होणार असल्यामुळे त्याच्या पत्रिकेत कल्पकता दाखविण्यात येत नाहीए. यासाठी पांढ-या रंगाच्या पत्रिकेवर सोनेरी नक्षीकाम करण्यात आले आहे. दोन्ही विवाहपद्धतीने लग्न केल्यानंतर ५ आणि ७ डिसेंबरला दिल्लीत संगीत आणि रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. संगीत कार्यक्रम छत्तरपूर येथील फार्म हाउसवर होईल.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅन्डी आणि कपिल हे दोघेही युवी-हेजचे लग्न अविस्मरणीय करण्यासाठी काहीच कसर बाकी ठेवत नाहीयेत. सॅन्डी आणि कपिल हे सेलिब्रेटींच्या विश्वातील नावाजलेले डिझायनर आहेत.

वाचा: फराहच्या इशा-यावर नाचणार युवी-हेजल

वाचा: युवराजने उलगडले दीपिका आणि किमसोबतचे त्याचे गुपित

इंडोनेशियातील बाली येथे ११ नोव्हेंबरला दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत युवी-हेजलचा साखरपुडा झाला होता. हेजल किच हिने सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटात करिना कपूरची मैत्रीण आणि सलमान खानच्या पत्नीची भूमीका साकारली होती. तसेच ‘बिग बॉस’ या रियालिटी शोच्या एका पर्वात ती सहभागी झाली होती.

* युवराज-हेजल यांची मेहंदी सिरेमनी (प्री-वेडिंग पार्टी) २९ नोव्हेंबरला चंदिगड येथील ललित हॉटेल येथे होईल.
* ३० नोव्हेंबरला शीख विवाह पद्धतीनुसार लग्न झाल्यानंतर या दोघांकडून रात्रीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
* २ डिसेंबरला युवराज-हेजल गोवा येथे हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न करतील.
* ५ डिसेंबरला युवराज-हेजल दिल्लीमध्ये छत्तरपूर येथील फार्महाऊसवर संगीत पार्टीचे आयोजन करणार आहेत.
* ७ डिसेंबरला दिल्लीत त्यांचे रिसेप्शन होईल. यावेळी क्रिकेट आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध चेहरे उपस्थित राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 11:59 am

Web Title: yuvraj and hazel keech wedding designers sandy and kapil khurana have left no stones
Next Stories
1 VIDEO: ‘दंगल’साठी आमिरचा ‘फॅट टू फिट’ प्रवास
2 ‘होय, मी अलिबागवरून आलोय’
3 Yuvraj and Hazel Keech Wedding: युवी-हेजलच्या लग्नात निमंत्रितांच्या यादीतून वगळले हे नाव..
Just Now!
X