30 November 2020

News Flash

युवराज सिंगने एक्स गर्लफ्रेंड किम शर्माच्या बिकिनी फोटोवर कमेंट करत उडवली खिल्ली

त्याने केलेली कमेंट सध्या चर्चेत आहे.

एकेकाळी युवराज सिंग आणि अभिनेत्री किम शर्मा यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांचे नाते फारकाळ टिकले नाही. आता युवराजने नुकताच एक्स गर्लफ्रेंड किमने सोशल मीडियावर शेअर केलेल्या बिकिनी फोटोवर कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकताच किमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे. ती या फोटोमध्ये अतिशय हॉट दिसत आहे. तसेच हा फोटो शेअर करत तिने ‘एक दिवस समुद्र किनाऱ्यावर घालवण्यापेक्षा आणखी काय चांगलं असू शकतं’ असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

What’s better than a day at the beach? #notmuch #flashback

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

तिच्या या फोटोवर युवराजने मजेशीर अंदाजात कमेंट केली आहे. त्याने “गांव बसा नहीं बस्ता लेकर पहुंच गई हैं मैडम” असे म्हणत किमची खिल्ली उडवली आहे. त्याच्या या कमेंटवर किमने देखील रिप्लाय दिला आहे. तिने ‘इंग्रजी प्लीज’ असे म्हटले आहे.

किम आणि युवराज अनेक वर्ष एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते. २००७ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांच्यामधील मैत्रीचे नाते कायम असल्याचे पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 2:19 pm

Web Title: yuvraj singh commented on ex girlfriend kim sharma photo on beach avb 95
Next Stories
1 रावणाला दिलं ‘इंग्लिश’मध्ये आव्हान; त्या वाक्यामुळे मनोज तिवारी होतायेत ट्रोल
2 ‘बहिर्जी’; स्वराज्यस्थापनेतील धाडसी शिलेदाराची गाथा लवकरच मोठ्या पडद्यावर
3 हृतिकने मुंबईमध्ये खरेदी केले दोन फ्लॅट, किंमत ऐकून बसेल धक्का
Just Now!
X