भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीचा तडाखेबाज खेळाडू युवराज सिंग याने सोमवारी निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल १८ वर्ष आपला ठसा उमटवल्यानंतर अखेर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. युवराजने त्याच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. क्रिकेटच्या मैदानावर कायम आपल्या खेळामुळे चर्चेत राहणाऱ्या युवराजचं वैयक्तिक आयुष्यदेखील तितकंच चर्चेत राहिलं आहे.

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचा जवळचा संबंध असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी लग्न केलं आहे. त्यामध्येच हेजल किचचादेखील समावेश आहे. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हेजल आणि युवराजने लग्न करण्याचा निर्णय घेतला.  हेजलशी लग्न करण्यापूर्वी युवराजने बॉलिवूडमधील काही नावाजलेल्या अभिनेत्रींना डेट केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री दिपिका पदुकोणचाही समावेश आहे.

१. किम शर्मा –
बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा आणि युवराज सिंह यांच्या लग्नाच्या बराच काळ चर्चा रंगल्या होत्या. जवळपास चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या ब्रेकअपमागे किमचा स्वभाव कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतं.

२. दिपिका पदुकोण –
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दिपिका पदुकोणने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न गाठ बांधली आहे. मात्र रणवीरशी लग्न करण्यापूर्वी युवराज सिंह आणि दिपिकाच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या होत्या. युवराज आणि दिपिका एकमेकांना डेट करत होते. अनेक वेळा या दोघांना पार्टीमध्ये वैगरे एकत्र पाहण्यात आलं होतं. दरम्यान, युवराजच्या अत्यंत पझेसिव्ह स्वभावामुळे या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं सांगण्यात येतं.

३. रिया सेन-
युवराजचं नाव अभिनेत्री रिया सेनसोबतही जोडलं गेलं होतं. या दोघांना अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. ‘गरबा, दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठकच्या ‘याद पिया की आने लगी’ या म्युझिक व्हिडिओने रिया प्रसिद्धीस आली होती. लॅक्मे, निरमा लाइम फ्रेश सोप, किओ कार्पिन बॉडी ऑइल, क्लोज अप टूथपेस्ट, लिमका, कोलगेट, रिलायन्स आणि अन्य काही प्रॉडक्सच्या जाहिरातींमध्येही झळकली होती.

४. नेहा धुपिया –
नेहा धुपिया आणि युवराज सिंह यांच्या अफेअरविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यांच्या अफेअरची चर्चा बराच काळ चालली होती. या दोघांची चर्चा केवळ कलाविश्वातच नाही,तर क्रिकेटविश्वातही झाली होती. मात्र काही वैयक्तिक कारणामुळे या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला

५. प्रिती झिंटा –
बॉलिवूडची डिंपल गर्ल अर्थात प्रिती झिंटा आणि युवराज सिंह एकमेकांना डेट करत असल्याचं सांगण्यात येत होतं. आयपीएल सामन्यांच्यावेळी देखील या दोघांना एकत्र पाहण्यात आलं होतं. मात्र या विषयी प्रिती आणि युवराजने मौन बाळगण पसंत केलं.