विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला इटलीतील टस्कनी येथे लग्नबंधनात अडकले. इटलीत अत्यंत निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या लग्नसोहळ्यानंतर विरुष्काने दिल्ली आणि मुंबईत आपल्या मित्रमंडळींसाठी खास स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. मुंबईतील सेंट रेगिस या हॉटेलमध्ये मंगळवारी मोठ्या थाटामाटात रिसेप्शन सोहळा पार पडला. क्रीडा आणि बॉलिवूड क्षेत्रातील बरेच सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. रिसेप्शनला अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, कतरिनापासून सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, नीता अंबानीपर्यंत अनेक बड्या लोकांची मांदियाळी होती. कोहलीचा जवळचा मित्र आणि खेळाडू युवराज सिंगसुद्धा या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहचला होता.

वाचा : प्रियांकाचा दोन लाखांचा ड्रेस पाहिलात का?

अनेकांनी या रिसेप्शनदरम्यान विरुष्कासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी युवराजनेही विराट आणि अनुष्कासोबत फोटो काढले होते. त्यातील एक फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर करत दोघांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. पण, त्याचसोबत त्याने विराट आणि अनुष्कासाठी ‘क्यूट निकनेम’ही वापरले. विराटला टीममध्ये ‘चीकू’ असे म्हणतात हे तर सर्वांनाच माहित आहे. मात्र, अनुष्कासाठी तिच्या युवी भावोजींकडे एक खास नाव होते. युवराजने अनुष्काचा उल्लेख पंजाबीमध्ये ‘रोजी पाभी’ ( रोजी भाभी ) असा केला.

वाचा : रेप सीनसाठी माधुरीवर टाकण्यात आलेला दबाव

मुंबईतील रिसेप्शननंतर अनुष्का विराटसोबत दक्षिण अफ्रिकेला जाण्यासाठी रवाना झाली आहे. हे दोघं त्यांचे नवे वर्ष दक्षिण अफ्रिकेत साजरे करतील. तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अनुष्का तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाकरिता मुंबईत परतणार आहे.