23 July 2018

News Flash

Yuvraj Singh: युवराजने उलगडले दीपिका आणि किमसोबतचे त्याचे गुपित

या दोन्ही अभिनेत्रींची नावं युवराज सिंगसोबत जोडली गेली होती.

युवराज सिंग लवकरच विवाबंधनात अडकणार आहे.

बॉलिवूडमध्ये कोणता कलाकार कधी काय बोलून जाईल याचा अनेकदा नेम नसतो. तसे पाहिले तर बॉलिवूड, मॉडेलिंग विश्व आणि क्रिकेट विश्व यांच्यातले नातेही असेच काहीसे आहे. आजवर या दोन्ही क्षेत्रांचे विविध कारणांमुळे सुत जुळलेले आपण पाहिले आहे. पण ही दोन्ही क्षेत्र पुन्हा एकदा एकत्र चर्चेत आली आहेत. या चर्चेचे कारण, क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेडल किच यांच्या लग्नामुळे तर आधीच अनेकांवर आनंदाचे वारे स्वार आहेत. पण दुसऱ्या चर्चेला निमित्तही युवराज सिंगच आहे.

वाचा: युवराज सिंगच्या लग्नात विराट-अनुष्का करणार विशेष घोषणा

अभिनेत्री नेहा धुपियाच्या #NoFilterNeha या ऑडिओ चॅट शोमध्ये नुकतीच युवराज सिंगने हजेरी लावली होती. युवराज आणि नेहा धुपिया खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे या शोमध्ये या दोघांच्याही गप्पांची चांगलीच मैफल रंगली होती. गप्पांच्या ओघातच युवराजला एक असा प्रश्न विचारण्यात आला की, त्याने दिलेल्या उत्तरासाठीच अनेकांचे कान टवकारले होते. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि किम शर्मासोबत युवराजचे नाव जोडले गेले होते. कालांतराने त्यानेही या चर्चांना अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिला होता. त्यामुळे युवराजला ज्यावेळी विचारण्यात आले की, ‘दीपिका आणि किम यांच्यापैकी सर्वात चांगलं किसर कोण आहे (चुंबन कोण घेतं)? नेहाच्या या एका प्रश्नाने युवराज निरुत्तरीतच झाला. त्याने याबाबतीच कोणत्याही प्रकारचे उत्तर द्यायला नकार दिला. ‘नो कमेन्ट्स’ असे म्हणत युवराजने त्या प्रश्नापासून मागेच राहण्याला प्राधान्य दिले. या प्रश्नाचा सामना करण्याआधी युवराज नेहाच्या प्रत्येक प्रश्नाला अगदी मैदानात एखाद्याच्या फुलटॉस चेंडूवर षटकार मारतात त्याप्रमाणे सरसकट उत्तरं देत होता. पण नेहाने या प्रश्नाची गुगली टाकताच युवी त्रिफळाचीत झाला असेच म्हणावे लागेल.

वाचा: युवराज-हेजलच्या लग्नात संगीत, मेहंदी आणि बरंच काही..

बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या दिवसांमध्येच दीपिका आणि युवराज रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे किम आणि दीपिकाच्या नात्यालाच निशाणा करत नेहाने युवराजवर प्रश्नांचा मारा केला होता. दरम्यान सध्या दीपिका आणि युवराज खुपच चांगले मित्र आहेत. युवराजच्या फॅशन ब्रॅण्ड लॉन्च सोहळ्याच्या वेळीही दीपिकाने त्याला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. गेला काही काळ क्रिकेट विश्वापासून काहीसा दूर असलेला युवराज सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री आणि मॉडेल हेजल किचसोबत युवी ३० नोव्हेंबरला शिख धर्मातील परंपरांअंतर्गत विवाहबद्ध होणार आहे.

First Published on November 28, 2016 7:02 pm

Web Title: yuvraj singh stumped when asked about better kisser between deepika and kim